पौड येथे हेलिकॉप्टर दुर्घटना! हेलिकॉप्टरमधील पायलटसह चारही प्रवासी जखमी.
निवासी संपादक :धनाजी पवार
पुणेः जिल्ह्यातील पौड येथे आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात हेलिकॉप्टरमधील पायलटसह चारही प्रवासी जखमी झाले असून, त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.हेलिकॉप्टर कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यापैकी आनंद कॅप्टन गंभीर जखमी असून ते बोलण्याच्या स्थितीत नाहीत. इतर तीन प्रवासींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर जिल्हा प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत अधिक माहिती मिळाल्यावर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी नागरिकांना कोसळलेल्या हेलिकॉप्टरपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे, कारण कोणत्याही क्षणी स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


