सुप्रीम कोर्टाच्या आरक्षण विरोधी निर्णयाविरोधात वाई बंदला समिश्र प्रतिसाद
वाई प्रतिनिधी :आशिष चव्हाण
वाई, दि. २२ : आरक्षण समर्थक संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या वाई बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला. सुप्रीम कोर्टाच्या वतीने एससी एसटीचे जाती जमाती मध्ये वर्गीकरण व क्रिमिलियर लागू करण्याच्या दिलेल्या निर्णया विरोधात आज वाई बंद पुकारण्यात आला होता.
सुप्रीम कोर्टाच्या वतीने एससी एसटीचे जाती जमाती मध्ये वर्गीकरण व क्रिमिलियर लागू करणे संबंधी असंविधानिक निर्णय दिला आहे या निर्णया विरोधात आज वाई शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला व या निर्णयाचा निषेध करण्यात आला या विषयासोबताच देशात व राज्यात अनेक ठिकाणी लहान मुली व महिलांवर होणारे अत्याचार याचाही निषेध करण्यात आला.
या बंदला वाई व्यापारी महासंघ यांचे योग्य सहकार्य लांभले. भारत बंदची घोषणा ही २१ ऑगस्ट २०२४ रोजी झाली मात्र याबद्दल माहिती शहरातील व्यापारी छोटे दुकानदार व्यावसायिक यांना वेळेत न मिळाल्यामुळे काल वाई बंद करता आली नाही. सामान्य वाईकर जनता व व्यापारी यांचा विचार करून महासंघातील सर्व पदाधिकारी यांच्या सोबत चर्चा करू कालचा बंद आज घेण्यात आला. त्यामुळे या बंदला समस्थ वाईकरांनी पाठिंबा देत दुकानें बंद ठेवली. दुपार नंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले.
या बंद मध्ये वाई तालुका व शहरातील सर्व आरक्षण समर्थक सर्व राजकीय सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला.


