विसगाव खोऱ्यात पावसाची धुवाधार बॅटिंग.
भोर प्रतिनिधी: धनाजी पवार
ADVERTISEMENT
भोर: भोर तालुक्यात गेल्या दहा दिवसाच्या विश्रांतीनंतर जोरदार पुनरागमन करीत पावसाने वीसगाव खोऱ्याला झोडपून काढले. भाताचे आगार समजल्या जाणाऱ्या वीस गाव खोऱ्यात यामुळे भात पिकाला संजीवनी मिळाली, मात्र पावसाची तीव्रता पाहता हाता तोंडाशी आलेल्या कडधान्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत प्रगतशील शेतकरी सूर्यकांत पवार यांना विचारले असता चालू हंगामात समाधानकारक पाऊस पडल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच मिलिंद म्हसवडे यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता घेवडा सोयाबीन मूग पिकाच्या झालेल्या नुकसानीने त्यांनी नाराजी व्यक्त केली. एकंदरीत पाहता पावसाविषयी शेतकऱ्यांमध्ये सममिश्र भावना आढळून आल्या.


