पाडेगाव (ता.खंडाळा)आश्रमशाळा येथे निर्भया पथकाचा प्रबोधनात्मक कार्यक्रम
उपसंपादक : दिलीप वाघमारे
बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने समता प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय पाडेगाव ता. खंडाळा जि. सातारा येथे निर्भया पथकाने प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतला
संपूर्ण निर्भया टीमने मुलींनी जागरूक राहणे जरुरीचे आहे. आपण वावरत असताना आपल्या आजूबाजूला आपल्याबद्दल काही चुकीचे घडत असेल तर आपण निर्भया पथक यांच्याशी किंवा लोणंद पोलीस ठाण्याशी संपर्क साधने जरुरीचे आहे. तसेच पुस्तक प्रेमी बना , पुस्तक प्रेमी बनाल तर आयुष्य घडेल तसेच सर्व क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर आहेत.आपण आपले आवडीचे क्षेत्र निवडा तसेच गुड टच, बॅड टच बाबत माहिती दिली तसेच समता प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय पाडेगाव या आश्रमशाळेवर निर्भयाचे फ्लेक्स लावून त्यावर निर्भया हेल्पलाइन नंबर 100/112/1091 तसेच मो.नं.7387241091 या नंबर वर संपर्क करण्याचे आव्हान केले आहे.
सदर कार्यक्रमास लोणंद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम निर्भया पथक प्रमुख भोसले मॅडम, गोपनीय अंमलदार पो.ना. दडस, मा. नलावडे उपस्थित होते याप्रसंगी मांगल्य शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव सूर्यवंशी पवन, माध्यमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक माने उत्तम, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. बिजले नामदेव , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. पर्यवेक्षक प्रदीप नलावडे यांनी सर्वांचे आभार मानले.


