तात्यांच्या अचानक जाण्यांमुळे पुरीगोसावी कुटुंबात मोठी पोकळी निर्माण झाली, तात्यांच्या समाधीचे अंतदर्शन घेतले, विद्यमान सभापती सौ. जयश्री ताई गिरी,
संभाजी पुरीगोसावी
सातारा जिल्हा जावली तालुक्यांच्या विद्यमान सभापती सौ. जयश्री ताई गिरी आणि श्री. सुहास गिरी उर्फ ( दादा ) यांनी तात्यांच्या समाधी स्थळावर पुष्पचक्र वाहून अंतदर्शन घेतले, स्वर्गीय रामचंद्र बापूपुरी पुरीगोसावी उर्फ (तात्या) हे माझे मामा होते,ऐंन दिपावलीच्या काळात आणि श्री. चवणेश्वर प्रसन्न नाथ साहेबांच्या यात्रेदिवशी हृदयविकारांच्या तीव्र धक्क्यांने मामांचे सातारा येथील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले, मामाच्या अचानक झाल्यामुळे पुरीगोसावी कुटुंबासह गिरी कुटुंबातही मोठी पोकळी निर्माण झाली, धार्मिंक जागरण,गोंधळ तसेच रिक्षा व्यवसाय असल्यामुळे मामांचा कुटुंबा पुरताच नव्हे, तर चांगलाच दांडगा जनसंपर्क होता, मामांची आठवण ही अजूनही सर्वांना कायम राहणार पुरीगोसावी कुटुंबाच्या नेहमीच पाठींशी राहणार असे उदागार सौ. जयश्री ताई गिरी यांनी केले आहेत. तात्यांच्या समाधी स्थळाचे अंत्यदर्शन घेताना सौ. जयश्री ताई गिरी आणि सुहास दादा गिरी यांना अश्रूं अनावर झाले.


