राजगड पोलिसांची मोठी कामगिरी! शिवरेत ६१ लाखांचा गुटख्याचा साठा हस्तगत
मंगेश पवार
दि. 23 नसरापूर :-राजगड पोलीस स्टेशन हद्दीत सातारा–पुणे महामार्गावरील शिवरे (ता. भोर) गावच्या हद्दीत हॉटेल राजस्थानी ढाबा येथे अवैध गुटख्याने भरलेला ट्रक उभा असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन पंचांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली. सदर ठिकाणी ट्रक क्र. एमएच-०४ जेयू ११३९ उभा आढळला. चालकास विचारणा केली असता त्याने योग्य माहिती दिली नाही. मात्र, ट्रकमधून गुटख्यासारखा उग्र वास येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पंच व कॅमेराच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली असता, बीलातील काही माल तसेच बिनबिलाचा रजनीगंधा पान मसाला व तुलसी 00 असा एकूण माल मिळून आला. ट्रकसहित जप्त मालाची एकूण किंमत ₹६१,२७,८४०/- इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी ट्रक चालक अश्वनी कुमार त्रिपाठी (सध्या रा. मुंबई, मुळगाव उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध राजगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.
ही कामगिरी मा. पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी (भोर विभाग – सासवड) राजेंद्रसिंह गौर, तसेच राजगड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस उपनिरीक्षक उमेश चिकणे, पो.ना. दत्तात्रय खेगरे, पो.शि. योगेश राजीवडे, राजगड पोलीस स्टेशनचे पो.उपनिरीक्षक अजित पाटील, महिला पोलीस अंमलदार प्रमिला निकम, तसेच अंमलदार अक्षय नलावडे, मंगेश कुंभार व अजय चांदा यांनी सहभाग घेतला.