हरवलेले तब्बल 20 मोबाईल तक्रारदारांना केले परत, बीडच्या शिवाजीनगर पोलिसांची दमदार कामगिरी,


 

संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी. बीड जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत अलीकडच्या काळात विविध ठिकाणीवरून मोबाईल चोरीचा तक्रारी दाखल झाल्या होत्या त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत शिवाजीनगर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांने विशेष मोहीम दाबून चोरीस गेलेले तब्बल वीस मोबाईलचा शोध घेवुन हे सर्व मोबाईल पोलिसांना संबंधित तक्रारदारांना परत करण्यात आले आहेत. आपल्या वस्तू परत मिळाल्याने नागरिकांमध्ये पोलिसांविषयी समाधान व्यक्त केले जात आहे. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक किशोर पवार यांची इंट्री झाल्यापासून दाखल झाल्यापासून गुन्ह्यांच्या तपासाला चांगलीच गती मिळाले आहे मागील चार दिवसांपूर्वी घरफोडी प्रकरणातील आरोपीला अवघ्या बारा तासांत बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. तर दोन दिवसांपूर्वी बीडच्या बस स्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरणाऱ्या आरोपीला देखील तात्काळ अटक करीत मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. सोमवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात चोरीस गेलेले मोबाईल हे पोलीस अधीक्षकांच्या उपस्थित नागरिकांना परत करण्यात आले आहेत. सदरची कामगिरी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर डिवायएसपी पूजा पवार पोलीस निरीक्षक किशोर पवार यांच्या उपस्थित ओळख पटवून नागरिकांना चोरीस गेलेले मोबाईल परत करण्यात आले आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाणेकडील पथकांचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!