पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे खाजगीकरण विरोधात विद्यार्थ्यांचा संप.
उपसंपादक : दिलीप वाघमारे
शिरवळ : सातारा जिल्ह्यातील क्रांतिसिंह नानासाहेब पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात नावाजलेली संस्था आज या संस्थेतील विद्यार्थी संपावर ते गेलेले आहेत या वेटरनरी कॉलेजमध्ये अद्यावत एक्स-रे मशीन सुविधा उपलब्ध आहे त्याचबरोबर किचकट शस्त्रक्रिया या ठिकाणी होत असतात. लंपे या आजारावरील लसीकरण या भागामध्ये या महाविद्यालयाच्या माध्यमातून केले जात असते.
मागील सहा दिवसापासून येथील विद्यार्थी शासनाच्या खाजगीकरणाच्या धोरणा विरोधात संपावरती गेलेले आहेत महाराष्ट्रामध्ये सात पशुवैद्यकीय महाविद्यालय आहेत महाराष्ट्रातील पशुधन करिता यातून निर्माण होणारे पशुवैद्यकीय डॉक्टर हे पुरेसे असताना देखील खाजगी संस्थांना परवानगी देण्याचा विचार शासन करीत आहे त्या संदर्भात शासनाने सहा जुलै 2024 रोजी अध्यादेश काढलेला आहे.खरे तर यामध्ये विधिमंडळात चर्चा करून योग्य निर्णय होणे गरजेचे असताना देखील मागच्या दाराने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सध्या परिस्थितीमध्ये या सात महाविद्यालयातून जे पशुवैद्यक उत्तीर्ण होतात त्यांच्याकरिता सुद्धा शासनाकडे पोस्ट उपलब्ध नसताना अशा प्रकारची भूमिका ही बेरोजगारी वाढवणारीच आहे. या ठिकाणी खाजगी पशुवैद्यकीय महाविद्यालय तयार झाले तर अपुऱ्या शिक्षकांशिवाय चालणाऱ्या या महाविद्यालयांचा दर्जा हा निश्चितपणे सुमार असणार आहे आणि यातून निर्माण होणारे मोठ्या संख्येने पशुवैद्यकांना नोकऱ्या कुठे मिळणार हा सुद्धा गंभीर प्रश्न दुर्लक्षित केला गेलेला आहे.
या ठिकाणी चालू असलेला संप मागील सहा दिवसापासून येथील पशुवैद्यकीय सेवा बंद पडल्यामुळे या भागातील पशुधन सध्या पावसाळी दिवसांमध्ये अनेक आजारांना तोंड देत आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला अडचणींना सामना करावा लागतोय त्यातच पुन्हा एकदा लंपिने तोंड वर काढले तर निश्चितपणे शेतकरी हवालदिल होईल. या पशुवैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपलब्ध असलेल्या सेवा पश्चिम महाराष्ट्रातून अनेक जनावरांना या ठिकाणी दिले जात असते. पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीमुळे खिलार जातीला चांगले दिवस पाहायला मिळू लागले आहेत. अशा अनेक शर्यतीमधील बैलांसाठी या ठिकाणी उत्कृष्ट असे सेवा मिळत असते ही सुद्धा मागील सहा दिवसांपासून बंद आहे त्याचबरोबर या ठिकाणी होत असलेल्या मोठ्या जनावरांवरील शस्त्रक्रिया या बंद पडलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये सामान्य शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. आज हा संप शासनाने तातडीने मिटवावा किंबहुना या विद्यार्थ्यांची मागणी सुद्धा योग्यच आहे. शासनाने खाजगीकरणाचा घातलेला हा घाट ताबडतोब थांबवावा. आज आज शासकीय व्हेटर्नरी कॉलेजमध्ये मिळत असलेले उत्कृष्ट सेवा ही बंद पाडून शेतकऱ्यांना खाजगी आणि महागडी सेवेचा घाट शासनाने घातलेला आहे यामुळे भविष्यात शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. पशुधन आणि शेतकऱ्यांचे होणारे प्रचंड नुकसान शासनाने योग्य वेळी लक्ष घालून ताबडतोब हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी शिरवळ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या वतीने डॉक्टर नितीन सावंत वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा अध्यक्ष यांच्या वतीने करण्यात येत आहे.