रामदास कांबळे यांचा वंचित बहुजन आघाडीत मोठ्या ताफ्यासह पक्षप्रवेश
दिलीप वाघमारे
खंडाळा तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते रामदास कांबळे यांनी आज वंचित बहुजन आघाडीत अधिकृत पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा कांतीताई सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी कांबळे यांनी खंडाळा तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांसह, तरुणांच्या मोठ्या गाड्यांच्या ताफ्यासह प्रवेश केला. गावोगावीून आलेल्या समर्थकांनी “वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद”च्या घोषणा देत उत्साहपूर्ण वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमाच्या वेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कांबळे यांनी पक्षप्रवेशानंतर बोलताना सांगितले की, “प्रबोधन, परिवर्तन आणि बहुजनांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीत काम करण्याचा निर्धार केला असून खंडाळा तालुक्यात पक्ष बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांसह मी झटणार आहे.”
यावेळी कांतीताई सावंत यांनी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की, “वंचितांचा आवाज बुलंद करण्यासाठी अशा कार्यकर्त्यांची साथ आवश्यक आहे. रामदास कांबळे आणि त्यांचा तरुणांचा ताफा पक्षात नवसंजीवनी आणेल.”
कार्यक्रमानंतर सर्व कार्यकर्त्यांनी खंडाळा शहरात जल्लोषपूर्ण रॅली काढत पक्षप्रवेशाचा आनंद साजरा केला.