भोर तालुक्यातील किकवी गावात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
सारोळे प्रतिनिधी : डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना शिक्षण, मतदानाचा, संपत्तीचा हक्क, प्रसुती रजेचा लाभ, कर्मचाऱ्यांची पेन्शन योजना, भारतीय रिझर्व्ह बॅंकेची स्थापना, सिंचन सोयींसाठी देशात पहिले धरण उभारण्याचे पाऊल, देशाचा कारभार चालतो ते संविधान आणि अशा कितीतरी मानवी हक्काच्या, हिताच्या गोष्टी करीत आधुनिक भारताच्या जडणघडणीत सिंहाचे योगदान देणारे युगपुरुष, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती किकवी गावात मोठ्या उत्साहात साजरी केली.
ग्राम पंचायत किकवी या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला सरपंच नवनाथ सयाजी कदम यांच्या हस्ते पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.ग्रामपंचायत सदस्य, भास्कर सकपाळ, मौलादीन शेख, अभिमन्यू कोंढाळकर,ग्रामस्थ, विश्वास कदम, पंकज कदम, सचिन कदम, चंदन कदम, गौरव कदम, सिद्धांत कदम,सुजित कदम, सनी कदम, विकास कदम हे उपस्थित होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठान व पंचशील महिला मंडळ यांच्या विद्यमाने डॉ बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध, क्रांती ज्योती सावित्री बाई फुले, शाहू महाराज,आण्णा भाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज या महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली, भोर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देऊन भोर ते किकवी ज्योत काढण्यात आली या मध्ये लहान मुलानी सहभाग घेतला, महापुरुषांच्या प्रतीची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली. फटाक्यांच्या आतिश बाजीने सारा परिसर दुमदुमून गेला.यामधे सर्व गावातील नागरिकांनी सहभाग घेतला होता.