खेडशिवापूर येथे वाईन शॉपमध्ये 1 लाख 48 हजारांची चोरी


मंगेश पवार

खेडशिवापूर (ता. हवेली) येथे अज्ञात चोरट्याने वाईन शॉपचे शटर उचकटून तब्बल 1 लाख 48 हजार 800 रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत राजगड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 95/2026 अन्वये BNS 305(a), 331(3), 331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपक शंकर जगदाळे (वय 40, रा. गराडे, ता. पुरंदर, जि. पुणे) हे सोनल वाईन्स, खेडशिवापूर येथे मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. दिनांक 1 मार्च 2026 रोजी रात्री 11.30 वाजल्यापासून ते 2 मार्च 2026 रोजी सकाळी 7.45 वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील विविध काउंटरमध्ये ठेवलेली एकूण 1,48,800 रुपयांची रोकड चोरी करून नेली.

ADVERTISEMENT

चोरीस गेलेल्या रकमेतील 200, 100, 50, 20, 10 रुपयांच्या नोटांसह नाणी व फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी ठेवलेली रक्कम यांचा समावेश आहे.

या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोसई पाटील हे करत आहेत.

पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीचा शोध सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!