पूर्वजांची पवित्र स्मृती जतन करण्यासाठी बौद्ध दफनभूमीत २०० वृक्षांची लागवड


संपादक दिलीप वाघमारे

सन 1825 इंग्रज टाजवटीचा तो कठीण काळ. त्या काळी मिळालेल्या या महार वतनी जमिनी, त्यातीलच सव्हें नं. 371 आजच्या मार्केटयार्डा शेजारी असणारी एक एकर जागेत समस्त खरात समाज दफनभूमीसाठी वापर करीत होता.

कारण त्या काळी बोद्ध पूर्वाश्रमीचे (महार) समाजाला हिंदूंच्या स्मशानभूमीत जाण्यास सक्त मनाई होती. ते “अस्पृश्य असल्याने, त्यांना अग्नी संस्काराचाही अधिकार नव्हता. इतकेच नव्हे तर, दारिद्रय इतके तीव्र होते की अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड विकत घेण्या इतकी ही ऐपत नव्हती. त्यामुळे मृतदेहांना दफन करण्याचीच परंपरा रूढ झाली होती.

सन 1930 च्या दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः मृतदेह दहनाची पद्धत स्वीकारली आणि समाजाला नव्या विचाराची दिशा दिली. पण 1825 पासून 1930 पर्यंत लोणंदमधील संपूर्ण बौध्द समाजाने या पवित्र भूमीत आपले पूर्वज दफन केले आहेत. या जमिनीत समाजाच्या आठ पिढ्यांचा इतिहास, संस्कृती आणि आठवणी गाडलेल्या आहेत. आजही खोदकाम झाले, तरी मानवी अस्थी येथे आढळतात- है या भूमीचे सजीव पुरावे आहेत. .

1924 साली सरकारने हस्तांतरीत केलेली सव्हें नं. 370 व 327 ही जमीन यशवंतराव चव्हाण सरक्षण मंत्री असताना 1967 साली बाजार समितीला देण्यात आली. मात्र 371 या जमिनिनीवर खरात समाजाचाच कब्जा होता. सरकारनेही ती दफनभूमी असल्याने बाजार समितीला ती जागा दिली नाही. पुढे 1975 पासून या जागेत समाजाने हॉटेल व दुकाने चालविण्यास जागा भाड्याने दिली होती. त्यातून मिळणारे भाडे समाजाच्या कामी येत होते. ग्रामपंचायतीचे नळ कनेक्शन, लाईट कनेक्शन याची अधिकृत नोंद समाजाच्या नावावर होती. मात्र 2013 नंतर काही काळ ही जागा बाजार समितीने पार्किंगसाठी वापरली. 2022 मध्ये समाजातील तरुण पुढे आले आणि या जागेभोवती तार कंपाऊड करण्यात आले. आज ती पूर्वजांची पवित्र स्मृतीस्थान म्हणून उभी आहे .

ADVERTISEMENT

सप्टेंबर 2025 रोजी वतन जमिनी (म्हारकी) मिळालेल्या जागांना दोनशे वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने समस्त बौद्ध समाजाने या ठिकाणी 200 वृक्ष लावण्याचा संकल्प केला आहे. यासाठी लोणंद नगर पंचायतीचे सहकार्याने व माजी वसुंधरा अभियाना अंतर्गत या ठिकाणी २०० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या वृक्षारोपणात प्रत्येक बौध्द कुटुंब आपल्या एका किंवा दोन पूर्वजांच्या स्मरणार्थ झाड लावणार आहे. या झाडांना जगविण्याची जबाबदारीही ते घेणार आहेत.

आजपर्यंत लोणंद शहराच्या विकासासाठी खरात समाजाने आपली जमीन कवडीमोल भावाने किंवा अगदी विनामूल्य दिली आहे. रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, पाण्याची टाकी, शाळा, रस्ते, मार्केट यार्ड, पोलीस स्टेशन व रस्त्यासाठी जागा देऊन समाजाने मोठा त्याग केला आहे. पण आता मात्र पूर्वजांची स्मृती असलेली ही जागा कोणत्याही परिस्थितीत बौद्ध बांधवांना करावी लागणार आहे. ही जमीन बौद्ध समाजाच्या अस्मितेची आहे, त्यामुळेच त्यांचे वारसदार म्हणून बौद्ध बांधव या ठिकाणी दोनशे झाडे लावून त्यांच्या स्मृती अमर करणार आहेत. .

त्यातील पहिल्या टप्प्यात शंभर झाडे शुक्रवार दि. १९ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता लावण्याचा संकल्प आहे.

यावेळी नगराध्यक्षा सौ. मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष गानिभाई कच्छी, मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड, माजी नागराध्यक्षा सीमा खरात, माजी नगरसेविका शैलजा खरात यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच जेष्ठ मार्गदर्शक बाळकृष्ण खरात, नंदकुमार खरात, सुरेंद्र खरात, कार्याध्यक्ष सुनील अण्णासाहेब खरात, अॅड. हेमंत खरात व सर्व नगरसेवक तसेच लोणंद नगरपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित राहणार आहेत.

अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष निखील खरात, भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष सज्जन खरात, महिला शाखा अध्यक्ष प्रीती खरात, आर पी आय अध्यक्ष सागर खरात, दत्तात्रय खरात, उमेश भाऊ खरात, वैभव खरात, चेतन खरात, संतोष मा. खरात यांनी दिली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!