“स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाला भोंगवलीत उत्स्फूर्त प्रतिसाद
संपादक मंगेश पवार
कार्यकारी संपादक सागर खुडे
दि. 17 भोर : –महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात आलेल्या “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या राज्यव्यापी आरोग्य अभियानांतर्गत भोर तालुक्यात महिलांच्या आरोग्य व कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी विविध शिबिरे आयोजित करण्यात आली.
या उपक्रमाचा उद्देश महिलांचे पोषण, माता-बाल आरोग्य, तसेच समाजात आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे हा आहे. एकाच दिवशी जिल्हास्तर, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि इतर आरोग्य संस्थांमध्ये कार्यक्रम पार पडले.
अभियानातील प्रमुख उपक्रम
महिलांसाठी पोषण व आरोग्य जनजागृती सत्रे
माता व बाल आरोग्य तपासणी व लसीकरण
असंसर्गजन्य रोग तपासणी (मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग)
मोफत नेत्र तपासणी व चष्मा वितरण
दंत तपासणी व उपचार शिबिरे
योग व आयुष शिबिरे
रक्तदान व अवयवदान प्रतिज्ञा शिबिरे
मानसिक आरोग्य व व्यसनमुक्ती जनजागृती
शालेय आरोग्य तपासणी व स्वच्छता जनजागृती
जिल्हास्तरावर आरोग्य मेळावे व प्रदर्शने
दुर्गम भागासाठी टेलिमेडिसिन सुविधा
उपस्थित अधिकारी, कर्मचारी व मान्यवर
डॉ. मेघा लोंढे, डॉ. नेहा शेवाळे, केदारी (फार्मसिस्ट), श्रीमती साळुंखे (लॅब टेक्निशियन), उमेश वाघोले, श्रीमती दुधाळ (सिस्टर), भोजने (ब्रदर), प्राची मोरे, श्रीमती दराडे, श्रीमती वर्षा सुर्वे (आशा), श्रीमती रवीना साळुंखे (आशा), श्रीमती अश्विनी गुरव (बीएफ), डॉ. मंदार माळी (BVG-108 अधिकारी), संतोष मोहिते (शिवप्रहार संघटना अध्यक्ष), शेतकरी संघटना प्रदेशाध्यक्ष श्यामसुंदर जायगुडे
या सर्व अधिकाऱ्यांच्या, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आणि सामाजिक संघटनांच्या सहभागामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. नागरिकांनी आरोग्य तपासण्या, मार्गदर्शन व विविध शिबिरांचा लाभ घेतला.
आरोग्य विभागाने महिलांच्या तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.