नांदेडच्या भूमिपुत्राचे नाशिक औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य जिद्द आणि परिश्रमातून घडलेले व्यक्तिमत्त्व : इंजिनियर जयपाल शिरसाठे


नाशिक प्रतिनिधी | एस.एन.नांदेडकर

जिद्द, मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर ग्रामीण भागातील युवकही औद्योगिक क्षेत्रात मोठे यश संपादन करू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मौजे तांदळी येथील इंजिनियर जयपाल दिगांबर शिरसाठे होत.

 

महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील एचएस हायस्पिरिट कमर्शियल व्हेंचर्स प्रा. लि. कंपनीच्या प्रिओरिटी ट्रायवर्ड विभागात व्यवस्थापक – उत्पादन विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या इंजिनियर जयपाल शिरसाठे यांची नुकतीच सदिच्छा भेट घेण्यात आली.

ADVERTISEMENT

 

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येत आपल्या मेहनत, तांत्रिक कौशल्य आणि नेतृत्वगुणांच्या बळावर त्यांनी उद्योग क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक संघशिल भद्रे उर्फ एस. एन. नांदेडकर सर, सहकारी जाधव सर, युवराज सर तसेच ब्रदर सुमेध शिरसाठे उपस्थित होते.

 

ग्रामीण भागातील युवकांनी शिक्षण, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे, असा प्रेरणादायी संदेशही यावेळी देण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!