शैक्षणिक व्हिडीवो निर्मितीमध्ये जवळवाडी शाळेचा प्रथम क्रमांक; तालुकास्तरावर शिक्षिका अनिता जाधव यांचे यश
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
मेढा : महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे वतीने राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडीवो निर्मितीमध्ये जवळवाडी ता.जावली येथिल जि.प.प्राथमिक शाळा जवळवाडी येथिल शिक्षिका श्रीम्.अनिता बाबुराव जाधव यांनी जावली तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविला आहे. इयत्ता पहिली व दुसरी भाषा विषय गटात त्यांनी हे यश संपादन केले आहे.
अनिता जाधव या सन २०२३-२४ मध्ये जवळवाडी शाळेत रुजू झाल्या असून शाळेच्या शैक्षणिक,भौतिक दर्जात अमुलाग्र बदल घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. शालेय विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांची अध्ययन पातळी उंचविण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू ठेवला आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या सातत्याने कार्यशील आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव देण्याचा त्या प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थी-पालक, ग्रामस्थ यांच्या मदतीने शाळेमध्ये उल्लेखनीय लोकसहभाग वाढविला असून सातत्याने पाठपुरावा करून शाळा सुशोभीकरणासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. स्व. यशवंतराव चव्हाण विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत लहान गटात तालुकास्तरीय तृतीय क्रमांक तसेच मंथन स्पर्धा परीक्षेत इयत्ता दुसरी मध्ये विद्यार्थिनी शिवन्या जवळ हिने केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
शैक्षणिक उपक्रमां बरोबरच त्या कवयित्री,लेखिका, गायिका,उत्कृष्ट सुत्र संचालिका म्हणून जावली तालुक्यात सुपरिचित आहेत. सध्या राज्यस्तरीय समूहात पुस्तक परीक्षण लेखनाचे कामही त्या करीत आहेत.
त्यांना मिळालेल्या यशाबद्दल
गट शिक्षणाधिकारी श्री धुमाळ साहेब,विस्तार अधिकारी श्री.कर्णे साहेब, जवळवाडी मा.सरपंच सुरेखा मर्ढेकर,वर्षाताई जवळ,अध्यक्ष सागर जवळ,केंद्रप्रमुख धनावडे मुख्याध्यापक श्री. उतेकर सर इ.मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.