मद्यधुंद कारचालकांने कोरेगांवच्या कोलवडीत तिघांना उडवले,अपघातात 12 वर्षीय मुलीचा मृत्यू, कोलवडी ग्रामस्थ पोलिसांवर आक्रमक.


 

संभाजी पुरीगोसावी (सातारा जिल्हा) प्रतिनिधी

ADVERTISEMENT

भरधाव वेगात मद्यधुंद कार चालकांने 12 वर्षीय मुलीला उडवले या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर कार चालकांने पुढे जावुनही दोघांना उडवले या दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातील कोरेगांव तालुक्यांतील सातारारोड पळशी दरम्यान कोलवडी गावात घडली आहे, अपघातानंतर कारचालक फरार झाला असून कोरेगांव पोलीस त्याच्या शोधात आहेत, जान्हवी सतीश जगदाळे असे अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे, कोरेगांव तालुक्यांतील कोलवडी गावांमध्ये रस्त्याच्या बाजूने निघालेल्या बारा वर्षांय युवतीला विरुद्ध दिशेने भरधाव वेगात मद्यधुंद कार चालकांने जोरदार धडक दिली, प्रतीक पवार असे या कार चालकांचे नाव आहे, अपघातानंतर कार चालकांने कार न थांबवता पुढे जावुनही दोघांना उडवले यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत, अपघातानंतर घटनास्थळावरून कार चालक फरार झाला त्यानंतर भीमनगर येथील एका शेतात संबंधित अपघातग्रस्त कार आढळून आली, या प्रकरणात कोलवडी गावचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले असून, या प्रकरणात कोरेगांव पोलिसांनी हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप कोलवडी ग्रामस्थांनी केला आहे, संशयित कार चालकांला पोलीस ताब्यांत घेणार नाहीत, तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यांत घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता, या अपघाताची नोंद कोरेगांव पोलीस ठाणेत झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिपाली मुसळे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!