जवान संदीप भिकाजी खोत (हवालदार) यांच्यावर शासकीय इतमामांत अंत्यसंस्कार, खोत कुटुंबीयांचा आक्रोश.


संभाजी पुरीगोसावी (कोल्हापूर जिल्हा) प्रतिनिधी. भारत माता की जय, वीर जवान अमर रहे च्या..! जयघोषात हजारोंच्या साक्षीने राधानगरी तालुक्यांतील चांदेकरवाडी येथील जवान संदीप भिकाजी खोत (वय 42 ) यांना शासकीय इतमामांत सोमवारी दुपारी अश्रूं नयनानी अखेरचा निरोप देण्यात आला, मद्रास इंजिनिअरिंग रेजिमेंट मध्ये गेले 22 वर्ष ते कार्यरत होते, हवालदार संदीप भिकाजी खोत हे कोलकत्ता येथे कर्तव्यावर असताना हृदयविकारांच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झाले, त्यांचे पार्थिव रविवारी दिल्ली मार्गे पुणे येथे विमानाने व आज सकाळी दहाच्या सुमारांस घरी आणले यावेळी आई-वडील पत्नी व नातेवाईकांनी फोडलेला हुंबरडा पाहून उपस्थितांना अश्रूं अनावर झाले, यावेळी सजवलेल्या ट्रॉलीतून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली, संदीप खोत यांचा बारा वर्षीय मुलगा हर्षवर्धन यांनी भडाग्नी दिला, जवान संदीप खोत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी परिसरांतील आजी-माजी सैनिक 109 बटालियन मद्रास इंजीनियरिंग रेजिमेंटचे प्रतिनिधी, माजी आमदार के.पी पाटील,मालोजीराजे बिंद्री साखर कारखान्याचे संचालक उमेश भोईटे काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हिंदुराव चौगुले माजी सभापती अरुण जाधव छत्रपती राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख उमेश भोईटे सरपंच सीमा खोत व विविध संघटनेचे पदाधिकारी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!