नवी मुंबई येथे पाटण तालुका मित्र मंडळ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार चा ‘संवाद मेळावा’ पार पडला.


 

नवी मुंबई प्रतिनिधी :शंकर माने

या संवाद मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते माजी मंत्री श्री.विक्रमसिंह पाटणकर(दादा), माजी मंत्री आ.श्री.शशिकांत शिंदे, पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मा श्री सत्यजितसिंह पाटणकर दादा व ncp शरद पवार पक्षाचे अध्यक्ष श्री. राजाभाऊ शेलार तसेच प्रमुख मान्यवर व मुंबई रहिवासी मित्र मंडळाचे पदाधिकारी व तरुण युवा कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थिती होती.

संबोधित करताना सत्यजितसिंहनी सुरवातीलाच तालुक्यात चालेल्या बाबींचा इतिवृत्त मांडला. चाललेली विकास कामे त्यांचा दर्जा किंवा अवस्था मुंबईकर यांनी पहिली तर तुम्ही हि थक्क व्हाल. पुढे दादांनी लोकसभा उमेदवारीवरून बोलताना म्हणले शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील, सुनिलजी माने, दीपकबापू पवार, आणि माझे नाव अशी नावे कार्यकर्त्यांनी मांडली. साहेब निर्णय घेणार आहेत त्यामुळे मी असो किंवा शिंदेसाहेब, बाळासाहेब पाटील, दीपक बापू आम्ही ठरवलं कि जो निर्णय घेऊ तो ठामच मग काही परिणाम होवोत. शेवटी पवार साहेब निर्णय घेणार आहेत त्यामुळे सोशल मीडियात असो कि अशी मोकळी चर्चा करणारे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. आणि मुंबई वाल्यानी आता कामाला लागा काही गोष्टी वेळो वेळी स्पष्ट करत जाऊ आता आपले एकच लक्ष लोकशाही वाचवायची असेल तर लोकसभा महत्वाची आहे त्यामुळे अफवा वर विश्वास विचार करत बसू नका.संघर्ष करण्याची तयारी ठेवा बाकी वेळोवेळी भेट राहू तेव्हा बोलूच.

ADVERTISEMENT

यावेळी मा शिंदे यांनी आपण कायमच पवार साहेबांच्या पाठी ठाम आणि खंबीर असणाऱ्या पाटणकर दादांच्या पाठी एकनिष्ठपणे उभे आहोत. कारण पाटणकर दादांसाठी आज हि सत्ताधारी पायघड्या टाकून आहेत त्यांना हवं ते पद आणि हवी ती मागणी पूर्ण करू शकतात पण पाटणकर दादांनी साहेबांवरचे प्रेम आणि निष्ठा कमी होऊ दिली नाही हेच मोठेपण आहे पाटणकर दादांचे त्यामुळे आमचे प्रेम कायमच दादांवर आहे होते राहील. सद्या लोकसभेचे वारे वाहत आहेत. जिल्ह्यातून बरीच नाव. आघाडीवर आहेत पण लोकसभेचा उमेदवार पवार साहेब देतील त्याच काम आम्ही दोघे एक निष्ठेने करणार आहोत. आणि आम्हाला कोणी गद्दार आणि भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनाम करू शकत नाहीत त्यामुळे आम्ही कुणाला हि उरावर घेण्याची धमक ठेवतो आणि त्यामुळे आम्ही त्याचे परिणाम हि भोगले आहेत पण आम्हाला त्याची परवा नाही. आम्हाला हि साहेब खंबीर आहेत. यामुळे आम्ही निडर आहोत.

माझी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर दादांनी राजकारण समाजकारणात केलेली काम संघर्ष आणी लोकांसाठी केलेले लोकोपयोगी कामे यांची सर्व इतिवृत्त मांडला. दादांनी सांगितले तालुक्यात मी आमदार असताना पाझर तलाव, धरणे बांधली तालुक्याची ओळख पाणीदार तालुका होती पण याच तालुक्यात आज टँकर नि पाणी द्यावं लागतंय हे दुर्भाग्य आहे. कुठे तलाव बांधण्यात आले का नाही. या अलीकडच्या 8-10 वर्षात कोणतं ठोस काम तालुक्यात झाले नाही ? मी तर कुठे रस्त्यावर खड्डे भरलेल्या कामाचे भूमिपूजन लोकार्पण केलंय असं आठवत नाही . बाकी युवकांनी आणि मुंबईकर राजकारण बदल पाहिजे तुम्ही सक्षम आहात मनावर घेतलं तर काही करू शकता. पवार साहेब याना आपण ताकद द्याची आहे लोकसभेचा उमेदवार साहेब देतील त्याला मताधिक्य द्यायचा हा आपला अजेंडा राहील असे प्रतिपादन दादांनी केले.

या संवाद मेळाव्यासाठी पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्व संस्थाचे चेअरमन,व्हॉ. चेअरमन, संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व सेलचे आजी/माजी प्रमुख पदाधिकारी, आजी/माजी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य, जेष्ठ कार्यकर्ते, पाटण तालुका मित्रमंडळ, मुंबई चे पदाधिकारी आणि सदस्य व मुंबई येथील पक्षाच्या कार्यकर्ते, नवी मुंबई व ठाणे परिसरात रहिवासी असणारे पाटणवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!