केंजळ येथून विवाहित महिला बेपत्ता.


 

सारोळे प्रतिनिधी:

पुण्यभूमी महाराष्ट्र न्युज

 

केंजळ (ता. भोर ) येथून शनिवार दि.६एप्रिल २०२४रोजी सायंकाळी ४ वाजण्याचे सुमारास विवाहित महिला राहते घरातून किकवी येथे बाजाराला जाते असे सांगून कुठेतरी निघून गेली आहे. याबाबत तिच्या पतीने राजगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हर्षदा प्रसाद दळवी वय वर्ष २२ रा. केंजळ ता. भोर जि. पुणे असे महिलेचे नाव आहे. तिचे पती प्रसाद रामदास दळवी वय वर्ष ३४यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.

ADVERTISEMENT

रंगाने गोरी, काळे केस, जाडसर नाक, अंगावर गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, उंची४.५ फूट भाषा मराठी, या वर्णनाची महिला कोणाला आढळल्यास पोलीस नाईक मदने नाना यांच्याशी 98810 77014 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मदने करीत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!