शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान धारकऱ्यांच्या वतीने सारोळे येथे शिवव्याख्यान आणि बलिदानमास आयोजित.
सारोळे प्रतिनिधी : फाल्गुन अमावस्या रोजी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी असते. फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या असा एक महिनाभर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या धारकऱ्यांकडून बलिदान मास पाळला जातो. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सारोळे यांच्यावतीने ह भ प अनिल महाराज देवळेकर यांचे शिवव्याख्यान रविवार दि.7 एप्रिल रोजी झाले, या कार्यक्रमासाठी सारोळे आणि भोर तालुक्यातून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी शिवव्याख्यानासाठी आले होते. प्रतिमेस रोज पुष्प अर्पण करून, त्यासमोर प्रेरणा मंत्र, ध्येयमंत्र आदी म्हणून श्री संभाजी सूर्योदय म्हणून रोज 10 मार्च ते 8 एप्रिल श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
संभाजी राजे त्यांच्या कारकीर्दीत 201 लढाया लढले. यापैकी एकाही लढाईत त्यांचा पराभव झालेला नाही. शत्रूच्या तावडीत सापडल्यानंतर अनेक हालअपेष्टा होऊनही त्यांनी धर्म परिवर्तन न करता हिंदू धर्मासाठी बलिदान दिले . त्यांचे हे बलिदान अजरामर झाले म्हणून त्यांच्या पुण्यतिथीचा दिवस बलिदान मास म्हणून साजरा केला जातो.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य सर्वांनाच प्रेरणा देते. धर्म, संस्कृती, राजकारण, राज्यकारभार, अर्थकारण समाज व्यवस्था यावर छत्रपती संभाजी महाराजांची मते अत्यंत परखड होती. राजाने नेमकी काय काम केले पाहिजे हे सांगणारे छत्रपती संभाजी महाराज होते.
छत्रपती संभाजी महाराजांनी मुघल सिद्धी पोर्तुगीज अशा अनेक परकीय सत्तांशी अखंड संघर्ष केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या स्वराज्याच्या पायाभरणीवर छत्रपती संभाजी महाराजांनी कळस चढविला. मराठा साम्राज्यापेक्षा 15 पट मोठे असणाऱ्या मोगल साम्राज्याला छत्रपती संभाजी महाराजांनी जेरीस आणले. संभाजी राजे 18 व्यावर्षी युवराज आणि 23 व्या वर्षी छत्रपती झाले.” पाहुनी शौर्य तुझंपुढे, मृत्यूही नतमस्तक झाला, स्वराज्याच्या मातीसाठी माझा छत्रपती संभाजी राजा अमर झाला.