आशा किरण सोशल फाउंडेशन अंतर्गत हुशार व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
सारोळे प्रतिनिधी : एकमेकांना मदत केल्यास समाजात नक्कीच बदल घडेल. आपल्याकडे अफाट संपत्ती असून कुणाच्याही उपयोगात येत नसेल तर ती संपत्ती पेपरच्या रद्दीसमान आहे, असे प्रतिपादन आशा किरण फाउंडेशनचे अध्यक्ष किरण साळेकर सर यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवाडी तालुका भोर जिल्हा पुणे येथील विद्यार्थ्यांना अशा किरण फाउंडेशनच्या अंतर्गत शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्षा सुप्रिया साळेकर, प्रमुख पाहुणे मा.सुवर्णा महादेव काळे. ( सदस्य ग्रामपंचायत काळेवाडी) डॉक्टर-नितेश जी पुणेकर (संचालक – पुणेकर आय केअर अँड कॉन्टॅक्ट लेन्स क्लिनिक औंध) तसेच काळेवाडी गावातील आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
आयुष्यात गरजूंना मदत देण्याची वृत्ती ठेवा. गरजूंना मदत करणे म्हणजेच मानवता धर्म पाळणे होय.
समोरच्याची गरज पाहून मदत करा. गरजू मुलांची गरज बघून पुस्तके, शालेयसाहित्य, कपडे द्या. गरज बघून मदत करावी. मी धर्माच्या मानवहिताचा संदेशाचे पालन करतो. केवळ ‘दुआ’ करून उपयोग नाही, तर मानवाचे दुःख दूर करण्याची ‘दवा’ बनले पाहिजे. असे अशा किरण सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष किरण साळेकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.


