सरपंच, उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी
मुं बई : सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. त्याचबरोबर ग्रामसेवक आणि ग्राम विकास अधिकारी या पदांबाबतही महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
महाजन यांनी सांगितलं की, ” राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनातदुप्पट करण्यात आलं आहे .तसंच आता ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पद विलीन करून हे एकच पद करण्यात आला आहे तसंच ज्या ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न ७५ हजार आहे त्यांना १० लाखापर्यंत निधीची वाढ करण्यात आली आहे तसेच ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात २० टक्के वाढ करण्यात आले आहे .
सरपंच , उपसरपंच यांच्या मानधनात भरीव वाढ केल्याबद्दलसरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे राज्य अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे , नितीन (काका )पाटील खासदार, विकास जाधव राज्य सचिव ,सर्व राज्य पदकधिकारी , पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोकळे , आनंद जाधव राज्य कार्यअध्यक्ष , शत्रुगुण धनावडे सातारा सरपंच परिषद सचिव ,सातारा जिल्हा उपाध्यक्ष बजरंग चौधरी , अरुण (भाऊ) कापसे , संजय शेलार जिल्हा कार्यकरणी ,जावळी तालुकाध्यक्ष पुंडलिक पार्टी , उपाध्यक्ष रविंद्र सल्लक , विजयराव सपकाळ तालुका सचिव ,जिल्हा समन्वयक सचिन दळवी ,तालुका कार्याध्यक्ष अजित मर्ढेकर ,जिल्हा समन्वयक रवी कारंजकर , अमोल आंग्रे व तालुक्यातील सर्वच पदाधिकारी यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन करण्यात येत आहे .


