कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी चिंचणी वांगी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला, स.पो.नि. अनिल जाधव यांची मुंबईला बदली.
संभाजी पुरीगोसावी प्रतिनिधी (सांगली जिल्हा) प्रतिनिधी.
सांगली जिल्हा पोलीस दलातील चिंचणी-वांगी पोलीस ठाण्याचे नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्याकडूंन पदभार स्वीकारला आहे, स.पो.नि. अनिल जाधव यांची मुंबईला बदली झाल्यामुळे चिंचणी-वांगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रिक्त होणार होते, स.पो.नि. अनिल जाधव यांनी देखील चिंचणी वांगी पोलीस ठाणेसह सांगली जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशावरून नव्याने रुजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी चिंचणी वांगी पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारला आहे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांनी यापूर्वी पुणे शहर, पुणे ग्रामीण विभागातील सासवड माळेगांव अशा विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली, कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून राहुल घुगे यांना ओळखले जाते, चिंचणी-वांगी पोलीस पोलीस ठाण्यात आजपर्यंत अनेक प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्या कामाची वेगळीच छाप पाडत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहात उत्कृंष्ट सेवा दिली, चिंचणी-वांगी पोलीस ठाणेच्या इतिहासामध्ये आजपर्यंत पोलीस ठाणेला खमक्या अधिकारी लाभले आहेत, नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे यांचे संपर्कांच्या माध्यमांतून संभाजी पुरीगोसावी यांनी स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.


