आयएएस अधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी स्वीकारला बाल विवाह निर्मूलनासाठी चा, प्रतिष्ठित स्कॉच चा पुरस्कार जाहीर.
संभाजी पुरीगोसावी
बीड जिल्ह्याने बाल विवाह निर्मूलन कार्यक्रम उत्कृंष्टपणे राबविल्याबद्दल स्कॉच या नामांकित संस्थेचा 2024 राष्ट्रीय पुरस्कार बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना आज प्रदान करण्यात आला आहे, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती. दीपा मुधोळ मुंडे यांना स्कॉच राष्ट्रीय पुरस्कार 2024 हा प्रदान करण्यात आला, स्कॉच संस्थेकडूंन क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीकरिता दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो, श्रीमती. दीपा मुधोळ मुंडे या बीड जिल्हाधिकारी असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात बाल विवाह रोखण्यासाठी विविध सकारात्मक पावले उचलण्यात आली होती, परिणामी बाल विवाह थांबविण्यात प्रशासनाला चांगलेच यश मिळाले होते, याच कामाची दखल घेवुन स्कॉच संस्थेच्या वतीने त्यांची निवड करण्यात आली आहे, स्कॉच संस्थेच्या वतीने नवी दिल्ली येथे ( दि. 21 सप्टें ) रोजी आयोजित हा पुरस्कार वितरण सोहळा श्रीमती. दीपा मुधोळ मुंडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, आयएएस अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आत्तापर्यंत संभाजीनगर धाराशिव बीड या जिल्ह्यात उत्कृंष्ट जिल्हाधिकारी म्हणून जिल्हावासीयांना सेवा दिली.


