मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर


महाराष्ट्र शासन च्या ग्रामविकास विभागाने जानेवारी  मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर केला आहे. याबाबतचा आदेश दि. १७ फेब्रुवारी २०२६ रोजी मंत्रालयातून जारी करण्यात आला.

हा कार्यक्रम महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १० (सुधारित तरतूद – सन २०२२ चा अधिनियम क्र. २२) अन्वये राबविण्यात येणार आहे. तसेच राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्यात येणार आहे.

प्रभाग रचना कार्यक्रमाचे प्रमुख टप्पे

१) प्रारुप प्रभाग रचना (फेब्रुवारी – मार्च २०२६)

२० फेब्रुवारी २०२६ पर्यंत तहसीलदारांकडून नकाशे अंतिम

२७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत तलाठी व ग्रामसेवक यांची संयुक्त स्थळ पाहणी

०५ मार्च २०२६ पर्यंत समितीकडून तपासणी

११ मार्च २०२६ पर्यंत प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

१७ मार्च २०२६ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून संक्षिप्त तपासणी

ADVERTISEMENT

२३ मार्च २०२६ पर्यंत राज्य निवडणूक आयोगाची मान्यता

३० मार्च २०२६ पर्यंत अंतिम प्रारुपावर समितीची स्वाक्षरी

२) हरकती व सूचना (एप्रिल २०२६)

०७ एप्रिल २०२६ – हरकती मागविण्याची जाहिर सूचना

१३ एप्रिल २०२६ – हरकती सादर करण्याची अंतिम मुदत

२१ एप्रिल २०२६ – उपविभागीय अधिकाऱ्यांकडून सुनावणी

२३ एप्रिल २०२६ – अंतिम प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे

३) अंतिम प्रभाग रचना (मे २०२६)

०४ मे २०२६ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून अंतिम प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगास सादर

आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर नमुना ‘अ’ मध्ये व्यापक प्रसिद्धी

राज्य शासनाने स्पष्ट केले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थेची मुदत संपण्याच्या सहा महिन्यांपूर्वी कोणतेही क्षेत्रीय किंवा हद्दीतील बदल करता येणार नाहीत. त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी निश्चित कालमर्यादेत प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे राज्यातील संबंधित ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया वेळेत पार पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!