पाडळी निकम वस्ती जि.प. शाळेला ३२ फुलझाडांच्या कुंड्यांची भेट; विद्यार्थ्यांचा सामुदायिक वाढदिवस उत्साहात साजरा


दिलीप वाघमारे

पाडळी (ता. खंडाळा) येथील जिल्हा परिषद पाडळी निकम वस्ती शाळेला व्हॉइस ऑफ मीडिया व सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने ३२ फुलझाडांच्या कुंड्या भेट देण्यात आल्या. तसेच शाळेतील १ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी दरम्यान जन्म झालेल्या विद्यार्थ्यांचा सामुदायिक वाढदिवस साजरा करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.

ADVERTISEMENT

शाळेच्या परिसरात हिरवळ वाढवून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमास व्हॉइस ऑफ मीडिया तालुका अध्यक्ष दशरथ राऊत, उपाध्यक्ष संदेश चव्हाण, संपर्कप्रमुख सुनील रासकर, सदस्य विजय शेळके, सातारा जिल्हा संपर्कप्रमुख हेमंत धायगुडे, पाडळी जि.प. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आबा धायगुडे, सुजन फौंडेशनचे अध्यक्ष अजित कुमार जाधव, संपादक मोहन बोरकर, पालक सोमनाथ धायगुडे तसेच निकम वस्ती शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुभाष धायगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. शाळेच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापक नजमा डांगे मॅडम व शिक्षिका स्वाती आरेकर मॅडम यांनी आयोजकांचे आभार मानले. भविष्यातही असे पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!