लोणंद शहरामध्ये विद्युत पुरवठा तीन तास बंद राहिल्याने खेळ खंडोबा
उपसंपादक :दिलीप वाघमारे
लोणंद शहरात सायंकाळ पासून विद्युत पुरवठा बंद असल्याकारणाने सर्वत्र अंधारमय परिस्थिती निर्माण झाली आणि पाऊस गेले तीन तास पडत असल्याकारणाने एकीकडे वीज नाही तर दुसरीकडे पावसाची सरीवर सरी यामुळे बाजारपेठ सर्व रस्ते अंधारमय वातावरणात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही ग्रामस्थांना याचा रस्त्यावरून करीत असताना असंख्य वाहनाशी सामना करावा लागत आहे विद्युत पुरवठा केव्हा होणार यासाठी वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना फोनवरून संपर्क साधला असता घोटाळा नक्की कोठे झाला ते न सापडल्याने वीज मंडळाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे नेहमी पाऊस सुरू झाला की विद्युत पुरवठा बंद होतो असे अनेकदा प्रकार घडले आहेत पाऊस संपला का पुरवठा पुन्हा पूर्ववत होत असल्याकारणाने वीज मंडळाचा कारभार केव्हा सुधारणा होईल अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसेच लोणंद पंचक्रोशी मध्ये चोरांचे प्रमाण वाढत आहेत त्यामुळे लाईट असणे ग्रामस्थांच्या हितकारक असल्याने वीज मंडळाने दैनंदिन कामकाजामध्ये सुधारणा दिवसेंदिवस का होत नाही आणि असा गलथान कारभार जनतेच्या माती का मारीत आहे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोध बोध घेणे काळाची गरज आहे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


