किकवी येथील ऑक्सफर्ड स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक वर्गाची वार्षिक क्रीडा स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न..
पुण्यभूमी न्यूज नेटवर्क
सारोळे : भोर तालुक्यातील किकवी येथील ऑक्सफर्ड स्कूलमध्ये पूर्व प्राथमिक वर्गाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा व पारितोषिक वितरण समारंभ दिनांक २३ जानेवारी २०२५ रोजी उत्साहात संपन्न.
खेळामुळे आपले शरीर हे शक्तिशाली बनते. खेळामुळे आपली बुद्धी तल्लीन होते. खेळामुळे आपले शरीर व मन उत्साही व आनंदी राहते.
खेळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खेळू शकतात हेच आज ऑक्सफर्ड स्कूल मध्ये आपल्या नातीबरोबर पालक व पाल्य यांच्यासोबत झालेल्या नर्सरी वर्गाच्या गेट रेडी या गेम मधून साठ वर्षीय आजोबांनी आपल्या नर्सरी वर्गातील नाती बरोबर खेळात सहभागी होऊन सर्वांचे मन लक्षवेधीत करून सामन्यात विजयी झाले.
ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल किकवी येथे पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांचे वार्षिक क्रीडा स्पर्धा स्कूलच्या प्रांगणात घेण्यात आल्या.
प्रमुख उपस्थिती बँक ऑफ महाराष्ट्र ब्रांच मॅनेजर शिरवळ व सौ. फसाबाई निर्मल लेडी पोलीस कॉन्स्टेबल शिरवळ यांच्या हस्ते पूर्व प्राथमिक वर्गाचे विविध प्रकारच्या खेळांचे पारितोषिक वितरण केले व त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पूर्व प्राथमिक विद्यार्थ्यांच्या फनी गेम घेण्यात आल्या यामध्ये नर्सरी वर्गात पालक व पाल्य हे एकत्र सहभागी होऊन गेट रेडी हा गेम घेण्यात आला यामध्ये सर्व पालक आपल्या मुलांबरोबर सहभागी झाले. ज्युनिअर केजी ग्रुप मध्ये केळी खाणे ,बिस्किट खाणे तसेच सीनियर केजी गटात रॅबिट रेस ,बस्टिंग बलून, सॅक रेस अशा विविध प्रकारच्या गेम घेण्यात आल्या.
प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांच्या रिले ,५० मिटर,८० मिटर,१५०० मिटर,८०० मिटर अशा विविध फायनल स्पर्धा आज वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी घेण्यात आल्या.
ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन कर्नल यशवंतराव बंडू रेणुसे, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य उमेश बन्सीलाल सोनावले व स्कूलच्या समन्वयीका सौ. जान्हवी उमेश सोनावले यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूर्व प्राथमिक वर्गातील वार्षिक क्रीडा स्पर्धा खूप मोठ्या उत्साहात पार पडली. स्कूलचे क्रीडा शिक्षक सौरभ चव्हाण, मंगेश गोळे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.