जावळीतील सातारा मामुर्डी येथील शिवाजी महाराजांचा पुतळा एकीचं प्रतिक
सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी
जावली ( मामुर्डी ) :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील ,जावली तालुक्यातील , मौजे मामुर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आज सुद्धा दिमाखात उभा आहे २९ फेब्रुवारी १९६८ साली हा उभारलेला जवळ जवळ ३० फुट उंच असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ऊन , वारा , पाऊस , उन्हाळा ,पावसाळा , हिवाळा या ऋतूमध्ये दिमाखात उभा आहे
परंतु सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा फक्त आठे ते नऊ महिन्यापूर्वी उभारण्यात आला होता तो अचानक कोसळला मामुर्डी गावची फक्त साडेसातशे लोक संख्या असलेल्या गावांमध्ये स्वनिधीतून ग्रामस्थांनी उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आज ही आहे तसाच आहे
१९६५ च्या दरम्यान मामुर्डी गावामध्ये दोन गट होते त्या दोन गटांना , सर्व गावकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी,गावातील तंटे मिटावे म्हणून विष्णू शेठ लक्ष्मण धनावडे यांच्या संकल्पनेतून हा पुतळा उभा राहिला त्यावेळी सर्वात जास्त देणगी वै हभप धोंडीबा भिकू धनावडे यांनी जमा केली त्यांना साथ कै . आनंदा तात्याबा धनावडे , तत्कालीन सरपंच कै धोंडीबा बाळा धनावडे तसेच गावातील सर्व लहान थोर लोकांनी सहकार्य केले सदरचे अश्वारूढ स्मारक चे शिल्पकार मौजे वाघेश्वर तालुका जावली चे शिवराम सावंत यांनी हा पुतळा उभारला या पुतळ्याचे फाउंडेशन कुसुंबी गावचे सुपुत्र विष्णू चिकणे यांनी बांधले हा पुतळा सिमेंट काँक्रीट मध्ये पूर्ण आहे खाली संपूर्ण पुतळा तयार करून जसाच्या तसा वरती ठेवलेला आहे सुरुवातीला महाराजांचा सांगाडा तयार करून सांगाड्यामध्ये सिमेंट काँक्रेट भरून हा पुतळा तयार केलेला आहे त्यावेळी प्रतापगडावरील अश्वारूढ पुतळ्याचा फोटो समोर ठेवून या पुतळ्याची उभारणी केली आहे ज्या शिल्पकाराने पुतळा उभारणी केली त्या वाघेश्वर गावचे शिल्पकार शिवराम सावंत ( चर्मकार ) यांना मजुरी म्हणून सात पोती भात दिले होते गेली ५६ वर्ष ऊन वारा पावसात छत्रपती शिवाजी महाराजांच स्मारक दिमाखात उभे आहे या स्मारकाला पारंपारिक शिवजयंतीला तालुका जिल्ह्यातून हजारो शिवभक्त दर्शनासाठी येतात या स्मारकासाठी शासनाचा एक रुपया ही अनुदान मिळालेले नाही संपूर्ण खर्च ग्रामस्थ , शिवभक्त स्वयंस्फुर्त वर्गणी / देणगीतून करतात.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भुमिपुजन श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह राजे भोसले यांनी केले आहे स्मारकाच अनावरन तत्कालीन दळणवळण मंत्री दादासाहेब जगताप व तत्कालीनआमदार भिलारे गुरुजी यांचे हस्ते झाले आहे
मामुर्डी गावच्या ग्रामस्थांनी एकजुटीने मोठ्या परिश्रमाने पुतळा उभारणीचा निर्णय घेतला व तो यशस्वीपणे राबवला एकजुटीने मोठ्या परिश्रमाने पुतळा उभारणेचा निर्णय घेणारे एकमेव मामुडी गाव आहे गावातील कोणताही कार्यक्रम असो सर्व ग्रामस्थ एकमताने निर्णय घेतात शिव विचारांनी प्रेरित होऊन १९६८ साली भव्य अश्वारूढ पुतळा उभारणीचा निर्णय घेऊन मामुर्डी ग्रामस्थानी एकीचं दर्शन घडवलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने ग्रामस्थ एकजुटीने विकास कामे असोत अथवा अखंड हरीनाम सप्ताह कोणत्याही विषयावर एकमताने निर्णय घेतात शिवछत्रपती स्मारक ही गावची खरी ताकद आहे शिव विचारांचा वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या मामुर्डी गावच्या शिवभक्तांना तसेच परिसरातील शिवभक्तांना प्रेरणास्थान आहे
छत्रपती शिवाजी महाराजांचा आता आहे तसाच , याच ठिकाणी अश्वारूढ पुतळा पंचधातु मध्ये बनविण्याचा ग्रामस्थ , शिवभक्त , सर्व तरुण , अबाल वृद्ध यांचा मानस आहे
सुनिल धनावडे अध्यक्ष, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती मामुर्डी


