अंगणवाडी केंद्र२ उत्रौलीमध्ये अनोख्या पद्धतीने वृक्षारोपण मोहीम
संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
आज ऊत्रौली अंगणवाडी केंद्र २ मध्ये “एक पेड माँ के नाम”या अनोख्या विषयावर समर्पित अशी वृक्षारोपण मोहीम आज दि.३१ ऑगस्ट २०२४ रोजी अंगणवाडी स्तरावर तसेच जिल्हा व प्रकल्प स्तरावर राबविण्यात आली.
यावेळी पर्यावरण वाचवण्याची, पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठीची प्रतिज्ञा घेऊन मुलांना जागरुक होण्यासाठी मार्गदर्शन देण्यात आले.
“जमीन पुनर्संचयित करण्यासाठी, वाळवंटीकरण रोखण्यासाठी आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी आपल्या सभोवतालच्या वातावरणात सुधारणा करण्यासाठी आम्ही आमचा पूर्ण पाठिंबा देण्याचे वचन देतो, ज्यामुळे पृथ्वीला एक चांगला ग्रह बनवता येईल” असे आवाहन करण्यात आले.
यावेळी अंगणवाडी सेविका मीना शिवतरे,वंदना शिवतरे,पालक संतोष कदम,यांसह विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.