मोटार सायकली व विहीरिवरील मोटारी चोरी करणा-या टोळीच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या.


उपसंपादक : दिलीप वाघमारे

लोणंद पोलीस ठाणे हददीत नागरिकांच्या मोटार सायकली व शेतक-यांच्या विहीरिवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरी झालेबाबत गुन्हे दाखल झालेले होते. सदर गुन्हयाचे तपासाबाबत पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे वरीष्ठांनी केलेत्या मार्गदर्शनावरुन लोणंद पोलीस

ठाण्याचे प्रभारी सुशिल भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यानी सदर घडणा-या गुन्हयांबाबत गोपणीय खब-ांमार्फत माहीती मिळवुन मिळाले माहीतीचे आधारे यातील संशयित आरोपी धिरज संजय गिरी वय २६ रा. बोरी ता. खंडाळा जि.सातारा अनिकेत जालिंदर येळे वय २१ रा. ठोबरेमळा, लोणंद ता.खंडाळा रोहित सदानंद शेळके वय २१ वर्षे रा.निंबोडी ता. खंडाळा ओम प्रकाश माने वय २० वर्षे रा.विर ता.पुरंदर जि.पुणे जयेश आनंदा मलगुंडे वय २६ वर्षे रा. कापडगाव ता. फलटण जि.सातारा ओम मोहीते रा. तांबवे ता. फलटण

ADVERTISEMENT

निष्पत्र केले. दिनांक ०६/०८/२०२४ रोजी यातील आरोपी हे सासवड ता. पुरंदर येथे असलेबाबत माहीती मिळाल्याने सुशिल भोसले, सहायक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाने आरोपीना ताब्यात घेवुन पोलीस स्टेशनला आणले. त्यांचेकडे अधिक विचारपुस.केली असता त्यांने व त्याचे साथीदारांनी मिळुन लोणंद पोलीस ठाणेचे हद्दीत चोरीचे २ व विहीरिवरील इलेक्ट्रीक मोटारी चोरीचे ३ गुनहे केलेची कबुली दिली असुन आरोपीकडुन मोटारसायकली व इलेक्ट्रीक मोटारी असा एकुण एक लाख सात हजार रुपये किमतीचा मुददेमाल

हस्तगत करण्यात आला आहे.

या कारवाईत लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशिल भोसले, गुन्हे प्रकरटीकरण पथकाचे पोहवा, संतोष नाळे, सर्जेराव सुळ, विद्ठल काळे, कैतन लाळगे, अभिजित घनवट तसेच पोहवा. संजय बनकर यांनी सहभाग घेतला


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!