नसरापूर येथे बिबट्याचा बछडा वाहनाच्या धडकेत जागीच ठार.
मुख्य संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
भोर, राजगड-(वेल्हे) मुळशी,पुरंधर हे तालुके सबंध महाराष्ट्रामध्ये भौगोलिक क्षेत्रफळानुसार विस्तारित आहेत.आणि त्यासोबत सर्वात जास्त डोंगराळ,घाटमाथ्याचा हा भाग आहे.त्यामुळं साहजिकच या भागात वन्यप्राण्यांचा,पशूपक्षांसह भूचर सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढलेला आहे,आणि आधुनिकीकरणाच्या कचाट्यात त्यांचें समूळ अस्तित्व नष्ट होऊन या जीवांना मानवीवस्तीत येणे भाग पडते.आणि ज्यामध्ये रानगवे, लांडगे, रानडुक्कर, कोल्हे,तरस, वाघ, बिबट्या या प्राण्यांचा समावेश आहे.वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे अशाच मुक्या प्राण्यांना रस्त्यावर जीव गमवावा लागतो. तसेच वेळेत अशा जखमी प्राण्यांना वनविभागाचे रुग्णालयात नेण्यासाठी रेस्क्यु टीम आणि रेस्क्यु वाहक वाहन नसल्याअभावी रात्री अपरात्री अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
त्याबद्दल वनविभागकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की पुणे सातारा महामार्गावर नसरापूर गावच्या हद्दीत विहार सोसायटी व शिंदे कॉलनी येथे बिबट्याचा वावर असण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.आणि नसरापुर येथील गारवा हॉटेल समोरच ब्रदर चायनीज सेंटर जवळ बिबट्याच्या बछड्याला अज्ञात वाहनाच्या धडकेत आपला जीव गमवावा लागला आहे.
सदरची घटना रात्री १०वाजण्याच्या सुमारास घडली असून चायनीज सेंटरचे सर्वेसर्वा सौरभ शेटे यांच्याशी याबाबत फोनवरून चर्चा होताच घटनास्थळी धाव घेऊन पुणे जिल्हा वन्यप्राणी- सर्परक्षक असोसिएशनचे सर्पमित्र विशाल शिंदे हे हजर झाले परंतु काळाच्या पडद्याआड तो बछडा हरवला.आणि सदर बछडा वनविभागाचे वनरक्षक आधिकारी गुट्टे सर यांनी बाजूला घेऊन पंचनामा केला. याक्षणी नागरिकानी यामध्ये जुन्नर तालुक्यातील असणारी स्पेशल रेस्क्यू टीम अशीच भोर तालुक्यात समाविष्ट करावी,आणि वनविभागमार्फत आसपासचे परिसरातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी यासाठी जनजागृती करावी,अशी मागणी केली.या मागणीचा विचार करून पाठपुरावा करण्यासाठी
भोर राजगड(वेल्हा ) मुळशी आमदार श्री.संग्राम थोपटे यांनीदेखील पुणे
उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग पुणे
तसेच भोर राजगड(वेल्हे)मुळशी यांना या मतदारसंघाच्या वनपरिक्षेत्र उपवनविभागात वन्यजीव रेस्क्यूसाठी एक वाहक वाहन आणि ५ मुले समाविष्ट करून व त्यांना आपल्या विभागामार्फत ‘वन्य जीव रक्षक’ म्हणून ओळखपत्र देण्यासाठी शिफारस करीत, दि.१३सप्टेंबर२४ रोजी विनंती केली असून त्याबाबत निवेदनदेखील दिले.