समता आश्रमशाळांमध्ये महिला दिनानिमित्त महा-मिनिस्टर कार्यक्रम संपन्न


दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

मांगल्य शिक्षण प्रसारक संस्था संचालित,समता प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय पाडेगाव, इनरव्हील क्लब लोणंद आणि रोटरी क्लब लोणंद यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त पाडेगाव येथे महा मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दि.14/03/26 रोजी पाडेगाव लोणंद व निरा पंचक्रोशीतील महिलांसाठी सुप्रसिद्ध निवेदक व सूत्रसंचालक श्री कुमार देवकाते यांचा महा-मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील महिलांनी या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला समाजातील विविध क्षेत्र कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. त्यामध्ये पोलीस,वकील, डॉक्टर,शैक्षणिक क्षेत्रात पीएचडी केलेल्या महिलांचा संस्थेच्या वतीने सर्वप्रथम सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री कुमार देवकाते यांनी विविध स्पर्धा खेळातून विजय झालेल्या महिलांना बक्षीस देण्यात आली प्रथम बक्षीस सोन्याची नथ सौ श्वेता मोरे,द्वितीय बक्षिस पैठणी सौ शीतल लाडगे, तृतीय बक्षीस चांदीचा छल्ला ऋशाली पवार, चतुर्थ बक्षीस सेमी पैठणी सौ रिना नवले व पाचवी बक्षीस एक ग्राम सोन्याचा गंठण सौ सुंदर पांडेवाड यांनी जिंकले. या सोबत लकी ड्रॉ मधून 50 जणींना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थिनी व त्याच्या पालकांनीही आनंद घेतला.या कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा सौ चैत्राली सुर्यवंशी, उपाध्यक्षा श्रीमती विमल सुर्यवंशी, सचिव श्री पवन सुर्यवंशी शाळेचे शिक्षक व कर्मचारी तसेच इनरव्हील क्लब व रोटरी क्लब लोणंद चे पदाधिकारी उपस्थित होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!