भोरमध्ये गॅस तुटवड्यावर प्रशासनाची धडक ; पुरवठा अधिकाऱ्यांची तपासणी भेट


मंगेश पवार

सद्याच्या गॅस तुटवड्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र नजन तहसीलदार भोर यांच्या निर्देशानुसार पुरवठा विभागतील अधिकाऱ्यांनी आज भोर मधील विविध हॉटेलमध्ये प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी पुरवठा निरीक्षण अधिकारी प्रितम गायकवाड, पुरवठा निरीक्षक श्रद्धा कांबळे तसेच गोदाम व्यवस्थापक इम्रान मुलाणी यांनी गॅस वितरण व्यवस्थेची सखोल तपासणी केली. गोदामातील साठा, वितरण प्रक्रिया तसेच नागरिकांना होणाऱ्या अडचणींची माहिती त्यांनी प्रत्यक्ष पाहणीदरम्यान घेतली.

ADVERTISEMENT

अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देत गॅस पुरवठा सुरळीत करण्यावर भर दिला. तसेच नागरिकांना वेळेत गॅस उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश देण्यात आले.

गॅस तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, प्रशासनाने या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!