किकवी येथे अंगणवाडींच्या वतीने बाळ आनंद मेळावा उत्साहात


मंगेश पवार

भोर तालुक्यातील किकवी गावात अंगणवाडी क्र. १, २ व ३ यांच्या संयुक्त विद्यमाने बाळ आनंद मेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

या वेळी जि.प. सदस्य, पंचायत समिती सदस्या तृप्ती ताई  खुटवड , पंचायत समिती सदस्य रोहनदादा बाठे, सरपंच नवनाथ कदम,तंटा मुक्ती अध्यक्ष किरण घारे, सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय भिलारे, विश्वास निगडे, हायस्कूलचे मुख्याध्यापक राऊत सर, ग्रामपंचायत सदस्या दिपाताई काकडे, वंदना अहिरे, सामाजिक कार्यकर्त्या वर्षा कदम सोनाली निगडे, चेतन कोंढाळकर , अक्षय अहिरे, डॉ. मंदार माळी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच डॉ. मयूर सपकाळ व डॉ. सायली सपकाळ यांचीही उपस्थिती होती.

ADVERTISEMENT

कार्यक्रमात अंगणवाडीतील बालकांनी साक्षरता गीत, “मोबाईल एक बुरी बला” हा संदेशपर कार्यक्रम, छावणी नृत्य, कॉमेडी डान्स व विविध गाणी सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पाटणे किरण निगडे  यांनी केले. शेवटी सर्व मान्यवर, पालक व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!