भोरमध्ये मोफत महाआरोग्य तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन
भोर : जागतिक महिला दिनाचे औचित साधून भोर येथे भव्य मोफत महाआरोग्य तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मा. आमदार संग्राम थोपटे (भोर-वेल्हा-मुळशी) यांच्या शुभहस्ते पार पडले.
सदर शिबिराचे आयोजन स्वरूपा संग्राम थोपटे, सदस्य पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक १३ मार्च २०२६ रोजी उपजिल्हा रुग्णालय, रामबाग, भोर (ता. भोर, जि. पुणे) येथे हा कार्यक्रम पार पडला.
या महाआरोग्य शिबिरात भोर तालुक्यातील विविध भागांतील मोठ्या संख्येने रुग्णांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी व उपचारांचा लाभ घेतला. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध आजारांची तपासणी, उपचार तसेच आवश्यक रुग्णांना शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते, तसेच भोर नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक, भोर पंचायत समितीचे नवनिर्वाचित सदस्य, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांसह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

