बकरी चोरट्यांच्या लोणंद पोलीसांनी आवळल्या मुसक्या.
सातारा प्रतिनीधी
लोणंद पोलीस ठाणे हददीतील आंदोरी ता. खंडाळा गावातुन ४५,०००/- रुपये किमतीची
तीन बकरी चोरी झालेबाबत गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्हयाचे तपासाबाबत पोलीस
अधीक्षक सातारा समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, यांनी सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे वरीष्ठांनी केलेल्या मार्गदर्शनावरुन लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सुशिल भोसले, सहाय्यक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अंमलदार यांनी सदर घडलेल्या गुन्हयांबाबत गोपणीय खब-यांमार्फत माहीती मिळवुन मिळाले माहीतीचे आधारे यातील आरोपी निष्पन्न केले. दिनांक १४/०४/२०२४ रोजी यातील आरोपी हे आंदोरी ता. खंडाळा गावामध्ये फिरत असल्याची खात्रीशीर माहीती मिळताच वरीष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सुशिल भोसले, सहायक पोलीस निरिक्षक व गुन्हे प्रकटीकरण पथकाने यातील तीन आरोपींना गुन्हयात वापरलेल्या स्वीप्ट कारसह ताब्यात घेतले. आरोपींकडे अधिक विचारपुस केली असता त्यांने व त्यांचे
दोन अल्पवयीन असणा-या साथीदारांनी मिळुन आंदोरी गावचे हदीतील खुरी नावच्या शिवारातून तीन बकरी चोरी केलेची कबुली दिली असुन आरोपींनी चोरी केलेली बकरी व चोरी करतेवेळी गुन्हयात वापरलेले वाहन स्वीप्ट कार अशी एकुण ५,४५,०००/- रु किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला
आहे.
आरोपींची नावे
1) ओंकार अशोक खुंटे वय २१ वर्षे रा. आंदोरी ता. खंडाळा जि.सातारा ( अटक)
२) करण विनोद खुंटें वय २१ वर्षे रा. आंदोरी ता. खंडाळा जि.सातारा ( अटक)
३) सुरज ऊर्फ चिंग्या संतोष खुंटें २३ रा आंदोरी ता. खंडाळा जि.सातारा ( अटक)
४) एक विधीसंघर्ष बालक
५) एक विधीसंघर्ष बालक


