हडपसर विधानसभा महायुती कार्यकर्ता मेळावा. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हडपसर विधानसभा मतदारसंघातील महायुती कार्यकर्ता मेळावा,
हडपसर प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री , अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित महायुतीचे समस्त कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उत्तम प्रतिसादासह पार पडला. देशाचे नवे विकासपर्व आणण्याकरीता उपस्थित समस्त पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी व स्थानिकांनी आपला भक्कम पाठिंबा दर्शवला. येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला विजयी कारण्याचा निर्धार करत, “अब की बार, ४०० पार” ची घोषणा सभागृहात घुमली आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून मला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार केला.

या प्रसंगी हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे , माजी आमदार योगेश टिळेकर, शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप दादा गारटकर, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी नगरसेविका रंजनाताई टिळेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तज्ञ संचालक सुरेश घुले, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप आण्णा घुले, मा.नगरसेवक मारुती आबा तुपे, भाजप विधानसभा अध्यक्ष हडपसर संदीप बधे , शिवसेना विधानसभा अध्यक्ष अभिजीत बोऱ्हाटे, नगरसेवक आनंददादा आलकुंटे , स्वीकृत नगरसेवक विकी माने , नगरसेवक सुरेखाताई कवडे , नगरसेवक नंदाताई लोणकर , नगरसेवक सुनील दादा बनकर ,डॉक्टर शंतनू जगदाळे , चंद्रकांत कवडे , संजीवनी जाधव , अमर तुपे , प्रकाश कदम , विकास रासकर , शिवाजी पवार , जीवन जाधव , सुरेश कदम , आबा शिंगोटे, बाळासाहेब कोद्रे , जतीन कांबळे , शिवाजी खलसे , विजय मोरे , वासंती काकडे , शोभा लगड , विजयाताई वाडकर, किशोर धायरकर, संदीप दळवी, भूषण तुपे , राजाभाऊ कदम , महादेव नंदी , योगेंद्र गायकवाड , बापू वाघ ,आदिनाथ भोईटे आणि महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


