पंढरपूरांत केअर टेकर महिलेनेच केली घरफोडी; ८.८० लाखांचा पंढरपूर पोलिसांनी केला मुद्देमाल हस्तगत…!! पंढरपूर शहर पोलिसांची दमदार कामगिरी..!!
संभाजी पुरीगोसावी
पंढरपूर शहरांतील एका घरांतून तब्बल ₹८,८०,७०० किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व वस्तू चोरीस गेलेल्या प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी घरातीलच केअर टेकर महिलेला पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे.
पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ४५७/२०२५, भा.दं.वि. कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादीच्या घरात काम करणाऱ्या केअर टेकर महिलेने च, घरात कोणी नसल्याचा फायदा घेत चोरी केल्याचे तपासात उघड झाले. सुरुवातीला तिने अनोळखी इसमाने चोरी केल्याची माहिती दिली होती. मात्र, गोपनीय माहिती व तपासादरम्यान हा दावा खोटा ठरला.
महिलेच्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी तिच्याकडून चोरीला गेलेले सर्व सोन्या-चांदीचे दागिने आणि वस्तू जप्त केल्या. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹८,८०,७०० इतकी आहे.
सदरची कामगिरी ही जिल्हा पोलीस अधीक्षक अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रितमकुमार यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो.उ.नि. आशिष कांबळे, पोसई राजेश गोसावी, पोह. सिरमा गोडसे, पोह. विठ्ठल विभुते, पोह. प्रसाद औटी, पोह. सचिन हेंबाडे, पोका कपिल माने, पोशि शहाजी मंडले, पोकॉ बजरंग बिचुकले, पोकॉ दिपक नवले, पोकॉ धनाजी मुटकुळे तसेच सायबर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीणचे पोकॉ रतन जाधव यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.


