विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला मा.मंत्री अनंतराव थोपटे यांचा वाढदिवस.


दि. 11 भोर राजगड ज्ञानपीठ भोर संस्थाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री मा.श्री. अनंतराव थोपटे साहेब यांच्या 93 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने

सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष कदम यांनी ९३ विद्यार्थी कडून पत्र लेखन उपक्रम राबऊन सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालय व ज्युनि. कॉलेज खानापूर विद्यालयातील व जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अनोख्या पध्दतीने वाढदिवस साजरा केला.

तालुक्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात माजी मंत्री तथा राजगड ज्ञानपीठ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतराव थोपटे यांनी अनन्य साधारण काम उभे करून सर्वसामान्य जनतेच्या विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध केले असून त्याच्या वाढदिवसानिमित्त

ADVERTISEMENT

विद्यालयातील इयत्ता पाचवी सहावीच्या व सातवी वर्गातील विद्यार्थीनी सुंदर हस्ताक्षरात पत्रलेखन करण्याचा आनंद घेतल्याचे संतोष कदम व राजेंद्र शेटे यांनी सांगितले.

 

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य संतोष ओतारी, सर्व शिक्षकवृंद धोंडिबा कुमकर, जयवंत थोपटे, संदीप पन्हाळकर, विशाल दळवी, संजय तळेकर, भगवान दामगुडे,

जिजामाता विद्यालयातील प्राचार्य कविता सुधीर वीर,विद्या विजय दामगुडे, भारती सतीश किंद्रे,

स्मिता संतोष घोणे,अनिता दशरथ तांबे शंकर सदाशिव धोंडे व विद्यार्थी उपस्थित होते

 

मकरसंक्रांत निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना तिळगुळ वाटप करून नवीन वर्ष चे शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!