दिवसा घरफोडी करणाऱ्या सराईत आरोपींच्या वडूज पोलिसांनी आवळल्या मुसक्या :- वडूज पोलिसांची दमदार कामगिरी,
उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी
वडूज पोलीस ठाणेचा पदभार स्वीकारल्यापासून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यात नेहमीच प्रयत्नशील, पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून प्रलंबित तसेच घडणारे गुन्हे हे उघडकीस आणण्यात यशस्वी ठरले आहेत, वडूज पोलीस ठाणेच्या हद्दीतील खटाव तालुक्यांतील कातरखटाव आणि तळवडे येथे दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या सरळ आरोपींच्या ओढच पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत, इब्राहिम अब्बास अली शेख (वय 25 ) रा. सूर्यवंशी मळा कराड) असे आरोपीचे नाव आहे, कराड कर्वे नाका येथून सदर आरोपींचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे, त्याच्या कब्जांतून नऊ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि सात हजार रुपये रोख रक्कम असा मध्यमान पोलिसांनी हस्तगत केला आहे, सदर आरोपींवर उंब्रज ढेबेवाडी कासेगांव विटा चिंचणी वांगी व कोडोली या पोलीस ठाणेत घरपोडीचे सात गुन्हे दाखल आहेत, फिर्यादी रमेश मारुती बागल यांनी घरफोडी झाल्याची वडूज पोलीस ठाणेत नोंद होती, सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कुडकर मॅडम उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे पोलीस उपनिरीक्षक रणधीर कर्चे रामचंद्र कांबळे शिवाजी खाडे गणेश शिरकुळे शशिकांत काळे अमोल चव्हाण मोहन नाचन किरण चव्हाण गजानन तोडकर जयदीप लवळे प्रशांत ताटे सत्यवान खाडे अमोल निकम कुंडलिक कटरे दीनानाथ जाधव रूपाली मोरे प्रीती पातेकर आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला,वडूज पोलिसांच्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक यांच्यासह जनतेतून कौतुक होत आहे,