नाथांच्या राज्यात एस टी संपामुळे महिला प्रवासापासून झाल्या अनाथ का ?उत्सव काळात महिलांना व प्रवाशांना सहन करावा लागतोय मानसिक मनस्ताप .;महिलांसह प्रवाशांची एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करण्याच्या चर्चाना उधाण
सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी
शासनाच्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी आज पूर्व नियोजित संप जाहीर केला. या संपात सर्व कर्मचारी सामील झाल्याने वाहतुकीत व सर्व कर्मचारी संपात सहभागी असल्याने अडथळा निर्माण झाल्याने राज्यातील शहरी व निमशहरी विभाग तसेच ग्रामीण पातळीपर्यंत आज महिलांच्यासह प्रवाशांना लालपरीच्या विस्कळितपणा मुळे अडचणींना सामोरे जावे लागले.
याबाबत राज्यात महिला व वयोवृद्ध., विद्यार्थ्यांना आज प्रवासाला वंचित राहावे लागल्याने नाथांच्या राज्यात प्रवाशांना अनाथ म्हणण्याची पाळी एस टी लालपरी प्रवास करणाऱ्यां प्रवाशांना वर आली…
याबाबतची माहिती अशी महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाच्या वतीने आज कर्मचारी संप आपल्या राज्यात सुरू झाल्याने व वाहतुकीचा विस्कळीत पणा आल्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणी ,व ७५ वर्षावरील महिला पुरुषावर व विद्यार्थी विद्यार्थिनीं यांना संपामुळे नाहक त्रास सहन करावा लागला असून मिळेल त्या वाहनाने प्रवास करावा लागला.. तर काहींना आपल्या घरी परत परतावे लागले.
गणेशोत्सव उत्सवासाठी गावाकडे येणार्या गणेश भक्तांना यामुळे मनस्ताप सहन करावा लागला आहे..
राज्य शासनाने गणेशोत्सवात घरपोच सेवा देण्याचे उद्दिष्ट राज्यातील जनतेला केले होते. त्याच दरम्यान कोकणात व पुणे सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील व राज्यातील लोकांसह आगावू आरक्षण केले. होते यात माझ्या लाडक्या बहिणीना (,दीड हजार दिलेल्या न मिळालेल्या ) व ७५ वर्षावरील मोफत प्रवास करणार्या वृद्धांना व विद्यार्थ्यांना युवक बालकांना या एस टीच्या संपामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे..
राज्यातील एस टी कर्मचाऱ्यांच्या भल्यासाठी जशा महिलांसाठी ५०% प्रवासातील सवलतीसाठी व ७५ वर्षावरील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत सवलतीसाठी प्रयत्न केले तसे या एस. टी कर्मचारी यांच्या मागण्याची वेळ आता शासनाने पूर्ण करावी. नाहीतर दडपलेल्या एस टी कर्मचाऱ्याच्या तोल सुटला तर अनेक बहिणींना व प्रवाशांना अनाथ करण्याची वेळ राज्यातील सरकारवर येवू नये अशी चर्चा आज एस. टी. प्रवासा पासून दूर राहिलेल्या संतप्त महिला वर्गाची होती………..