अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.वैशाली कडूकर यांचे तरुण भारत च्या पत्रकार गौरी आवळे यांच्याकडूंन स्वागत आणि सदिंच्छा भेट ..


संभाजी पुरीगोसावी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रांत अनेक बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातही अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम यांची पुण्याला बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असणाऱ्या डॉ.वैशाली ईश्वर कडुकर यांची सातारा अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर बदली झाली.

यावेळी ही माहिती कळताच बातमी करत मँडम चा फोटो पहिल्यांदा पाहिला. धाडसी, निर्भीड आणि संयमी असे व्यक्तीमत्व वाटले. त्यांनतर मँडम आल्यावर भेटायला जाणारच हा निर्धारच केला. यामुळे मँडम कधी हजर होणार यांची वाट बघत होती. मँडमना बुके नको, सावित्री माईचे पुस्तक भेट देऊ या…हा विचार मनात घर करुन गेला.

बदली होवून ही काही दिवस उलटून गेले. तरी त्या हजर झाल्या नसल्याचे कळले. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याचे पोलिसांकडून कळले. हे ऐकून वाईट वाटले. पण त्या हजर होणार कधी ही प्रतिक्षा काही केल्या संपत नव्हती.

ADVERTISEMENT

याच विचारात शनिवारी डॉ.वैशाली मँडम हजर झाल्याचे कळले. यावेळी पुरीगोसावी यांच्या माध्यमातून मॅडमचा संपर्क नंबर घेवुन मँडमला संपर्क साधला आणि स्वतः ची ओळख सांगत लवकर भेटायला येते म्हणत बोलणे झाले. सोमवारी जमले नाही. मात्र मंगळवारी पोलीस अधीक्षकांची पत्रकार परिषद असल्याचे कळताच आनंद झाला. चला आज मँडमची भेट घेणार असे म्हणत पत्रकार परिषदेला पोहचले. पत्रकार परिषद झाल्यावर मँडम च्या केबीन बाहेर जावून उभे राहिले. काही वेळात आत गेले. मँडमना समोर पाहून आनंद झाला. फक्त फोटो बघून नाही तर प्रत्यक्षातही धाडसी, निर्भीड आणि संयमी असे व्यक्तीमत्व वाटले.

मँडम चे पुस्तक देऊन स्वागत केले. मँडमनी ही स्वागत स्विकारले. येते मँडम, म्हणत त्यांच्या केबीन मधून बाहेर पडले खरे….पण ही भेट मनात घर करुन गेली. एक महिला जेव्हा मोठ्या पदावर पोहचते. तेव्हा सगळ्यांना तिचे पद दिसते. परंतु घरापासून ते उच्च पदापर्यंत पोहण्याचा प्रवास किती खडतर असतो….हे फक्त तिलाच माहिती असते.

हा प्रवास प्रत्येक महिला शब्दांत व्यक्त करेल असे नाही. आणि व्यक्त केले तरी समाज काय पाठीशी उभा राहत नाही. हे खरे वास्तव मी ही नाकारणार नाही. मँडम सारख्या अनेक महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. ही बाब खूप प्रेरणा देणारी आहे…..!

गौरी आवळे, संस्थापिका-अध्यक्षा

‘वीरांगना प्रतिष्ठान’

तरुण भारत क्राईम रिपोर्टर


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!