गणेश उत्सव २०२४ शांतता कमिटी मीटिंग.
उपसंपादक : दिलीप वाघमारे
लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना कळविण्यात येते की,दिनांक 4/09/2024 रोजी सायंकाळी 05:00 वा. अमृता मंगल कार्यालय लोणंद पोलीस ठाणे समोर या ठिकाणी आगामी येणाऱ्या गणेश उत्सव 2024 व ईद-ए-मिलाद सणाचे अनुषंगाने लोणंद पोलीस स्टेशनचे वतीने गणेश मंडळाचे पदाधिकारी / कार्यकर्ते /शांतता कमिटी सदस्य / मुस्लिम समाजाचे प्रतिष्ठित लोक,मौलवी यांची मीटिंग आयोजित केलेले आहे.
सदर मीटिंग करीता सर्व शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार असून पोलीस विभागामार्फत गणेश उत्सव अनुषंगाने मार्गदर्शन करून सूचना देण्यात येणार आहेत तरी सदर मीटिंग करता सर्व पोलीस पाटील गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष / उपाध्यक्ष /पदाधिकारी /शांतता कमिटीचे सदस्य / ज्येष्ठ नागरिक / डीजे चालक-मालक / गावा मधील सर्व गणेश उत्सव मंडळाचे पदाधिकारी हजर राहतील
पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस पाटील यांनी मंडळाचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन दिनांक 4/9/2024 रोजी सायंकाळी 05:00 वाजता अमृता मंगल कार्यालय लोणंद पोलीस ठाणे समोर हजर राहवे.
सुशील बी भोसले, सहा.पोलीस निरीक्षक
लोणंद पोलीस ठाणे


