फलटण येथील महिलांनी रक्षाबंधनाच्या मला राख्या बांधल्या त्यांच्यासाठी आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध राहणार


 

उपसंपादक : दिलीप वाघमारे

 

फलटण, दि. 03 : फलटण शहर व परिसरातील ज्या महिलांनी आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने मला राखी बांधली आहे; त्यांच्या सन्मानासाठीत्यमी माझ्या आयुष्यातील शेवटच्या श्वासापर्यंत कटिबद्ध राहणार असल्याचे मत माजी विरोधी पक्ष नेते अनुप शहा यांनी व्यक्त केले. यावेळी या रक्षाबंधन कार्यक्रमाचा जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कडून राखी बांधून शुभारंभ करण्यात आला.

 

फलटणच्या नवलभाई मंगल कार्यालय येथे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतत्वाखाली भारतीय जनता पार्टी फलटण शहर व माऊली फौंडेशनच्या वतीने “रक्षाबंधन कार्यक्रम” आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना अनुप शहा बोलत होते.

ADVERTISEMENT

 

यावेळी बोलताना शहा म्हणाले की; फलटणच्या गावठाणामधील महिला बहीण यांना कोणत्याही व कसल्याही प्रकारची अडचण आली तर हा अनुप शहा त्यांच्या सोबत पूर्ण ताकदीने उभा राहणार आहे. शहरातील बहिणींसाठी काम करीत असताना कोणत्याही शासकीय योजना ह्या अगदी त्यांच्याकडे कार्यरत होत आहेत की नाही हे सुद्धा आम्ही नेहमी बघत आलो आहे. माजी खासदार रणजितसिंह यांच्या माध्यमातून फलटण शहरातील बघिनींना विविध योजनांचा लाभ देण्याचे काम केले आहे व यापुढे सुद्धा आम्ही कार्यरत राहणार आहे.

 

नवलभाई मंगल कार्यालय येथे आयोजित “रक्षाबंधन कार्यक्रमात” तब्बल 1500 बघिनींनी सहभाग घेतला होता.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!