महाराष्ट्राचे नंदनवन व पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात पावसाची संततधार.
उपसंपादक : दिलीप वाघमारे
महाबळेश्वर, पाचगणी पावसाची संततधार सुरु आहे. महाबळेश्वर येथील पावसाने या हंगामातील १०० इंचाचा टप्पा रविवार पार केला आहे. आजपर्यंत १३६ इंच पावसाची नोंद झाली. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होत आहे. महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा लेक भरून वहात आहे. यामुळे वेण्णा लेक व लिंगमळा परिसरातील शेती व पूल पाण्याखाली गेल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.

महाराष्ट्राचे नंदनवन व पावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात पावसाची संततधार सुरू आहे. मागील चार दिवसांपासून संततधार सुरू आहे. जुलैच्या सुरवातीपासून पावसाने जोर धरल्याने महाबळेश्वर परिसरातील नद्या, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले आहेत.
महाबळेश्वर येथील बऱ्याच पॉईंटवर पर्यटकांची गर्दी होत आहे. त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी व पर्यटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध विभागांचे संयुक्त पथक स्थापन केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून महाबळेश्वर येथील पर्यटकांची गर्दी असणारे पॉईंट्स व लिंगमाळा धबधबा पर्यटकांसाठी काही दिवस बंद ठेवण्यात आले आहे.
महाबळेश्वर ते तापोळा रस्त्यावर वारंवार दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत.


