जन्मदिवसाच्या निमित्ताने मामुर्डी शाळेला साऊंड सिस्टीम भेट


 

सातारा / जावळी : बजरंग चौधरी

जावळी तालुक्याचे सांप्रदायिक क्षेत्रातील वैभव , मामुर्डी गावचे सुपुत्र हभप सौरभ महाराज धनावडे यांचे वडील व युवा उद्योजक शंकर तात्याबा धनावडे यांनी आपल्या जन्मदिवसानिमित्त आय एस ओ मानांकित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मामुर्डी या शाळेस साऊंड सिस्टिम भेट दिली.

शंकर धनावडे हे युवा उद्योजक असून आपला जन्मदिवस मोठ्या डौलात करण्यापेक्षा जन्मदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन त्या पैशातून शाळेची असणारी गरज पाहून त्यांनी शाळेस साऊंड सिस्टिम भेट दिली.

जन्मदिवसाच्या औचित्य साधून शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. शाळेबद्दल व शिक्षणाबद्दल प्रेम असणारे शंकर नाना हे दरवर्षी जन्मदिवसानिमित्त शाळेला काही ना काही तरी भेट वस्तू देत असतात.

ADVERTISEMENT

असा आदर्श सर्व तरुण मंडळीनी घेतल्यास अशा शाळा स्वयंभू होतील. असे मत श्री केदारेश्वर विकास मंडळाचे माजी अध्यक्ष राजेंद्र धनावडे यांनी काढले .शासनापेक्षा शाळेच्या गरजा या गावातून किंवा अशा भेटवस्तु रूपातुन मिळाल्यास शालेय भौतिक गरजांचा कायापालट झाल्याचे दिसून येईल असे मत तुकाराम शेलार सर यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय धनावडे , उपाध्यक्ष बजरंग चौधरी, अनिकेत मोरे ,शालेय समिती सदस्य ,शाळेचे मुख्याध्यापक सुरेश धनावडे व त्यांचे सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते. शंकर नानां च्या या कार्याचे मंडळाचे आजी माजी अध्यक्ष , उपाध्य क्ष सर्व सदस्य सरपंच सर्व सदस्य सर्वच स्तरातून तसेच छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब , श्री केदारेश्वर विकास मंडळ , श्री केदारेश्वर भजन मंडळ तसेच ग्रामस्थांनी कौतुक केले .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!