भोर तालुक्यातील गटांचे आरक्षण निश्चित; राजकीय हालचालींना वेग
मंगेश पवार
पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२५ साठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. यामुळे भोर तालुक्यातील राजकीय समीकरणात चांगलाच बदल घडला असून, विविध पक्षांच्या स्थानिक नेत्यांमध्ये उमेदवारीच्या चर्चांना वेग आला आहे.भोर तालुक्यातील विविध गणाचे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज सोमवार दि.१३ ऑक्टोंबर २०२५ रोजी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात आणि तहसीलदार राजेंद्र नाजन यांच्या उपस्थितीत पार पडला
या सोडतीनुसार भोर तालुक्यातील पंचायत समिती गटांचे आरक्षण पुढीलप्रमाणे निश्चित झाले आहे –
भोंगवली पंचायत समिती गण — सर्वसाधारण (पुरुष)
कामथडी पंचायत समिती गण — महिला
वेळू पंचायत समिती गण — सर्वसाधारण (पुरुष)
नसरापूर पंचायत समिती गण — सर्वसाधारण (पुरुष)
कारी पंचायत समिती गण — ओबीसी (महिला)
उत्रौली पंचायत समिती गण — महिला
भोलावडे पंचायत समिती गण — ओबीसी
शिंद पंचायत समिती गण — महिला
तर जिल्हा परिषद गटनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे –
५६ वेळू – नसरापूर — नागरिकांचा मागास प्रवर्ग
५७ भोंगवली – कामथडी — सर्वसाधारण
५८ भोलावडे – शिंद — सर्वसाधारण
५९ उत्रौली – कारी — सर्वसाधारण
या आरक्षणानंतर भोर तालुक्यातील पारंपरिक राजकीय घराण्यांमध्ये उमेदवारीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. अनेक विद्यमान सदस्यांना त्यांचा गट आरक्षित झाल्याने अडचण निर्माण झाली आहे, तर काही नव्या चेहऱ्यांना उमेदवारीची संधी उपलब्ध झाली आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, काही पंचायत समिती गणांमध्ये स्थानिक नेत्यांमधील गटबाजी पुन्हा उफाळून आली आहे. विविध पक्षांनी येत्या काही दिवसांत रणनीती आखण्यासाठी बैठकांचे नियोजन सुरू केले आहे.
जिल्हा परिषद निवडणूक २०२५ ही राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार असून, ग्रामीण भागातील विकासाचे समीकरण ठरवणारी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.