अमृत महोत्सवी वर्षातील १५ऑगस्ट२०२४ रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुनीजनांचा सत्कार.
कार्यकारी संपादक: सागर खुडे
आज प्राथमिक आरोग्य केंद्र भोंगवली येथे १५ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिन आणि अमृत महोत्सवी वर्षाचे निम्मित NQAS(एनक्यूएएस) प्रकल्प म्हणजेच आरोग्य दिन विषयक विशेष माहीतीचे भोंगवली येथे आरोग्य केंद्रात चक्क जिन्याच्या पायऱ्यावर उत्कृष्ट चित्रीकरण केल्याने तालुका मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.श्री.कापसीकर सर, सरपंच भोंगवली मा.श्री.अरुण पवार तसेच ग्रामसेवक,माजी सैनिक यांचें हस्ते करण्यात आले.तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे श्री.सुशांत मोहिते यांच्या वतीने वाटप करण्यात आले.या प्रसंगी १०८ वैद्यकीय सेवा प्रदान करणाऱ्या अधिकारी वर्ग त्याचप्रमाणे उत्कृष्ट प्रसूती आरोग्य सेवा देणाऱ्या आधिकाऱ्यांचा विशेष सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. महावितरणचें कर्मचारी श्री.भिसे सर यांनी विद्युत सेवा दिल्याबद्दल ग्रामपंचायत भोंगवली आरोग्य केंद्राचे वतीने त्यांचादेखील विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ.सौ.मेघा लोंढे, डॉ.मंदार माळी आदर्श वैद्यकीय अधिकारी समवेत आरोग्य आधिकारी वृंद, आरोग्य सेविका पदावर कार्यरत असणाऱ्या सर्व महिला भगिनीसह श्री.सुशांत मोहिते,वाघोले आणि सर्व कर्मचारी वृंद उपस्थित मोठ्या संख्येने होते.

 
			

 
					 
							 
							