आगामी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवणार:अमित(दादा)कदम.


 

सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी

 

मेढा : – जावली तालुक्यातील मेढा येथे झालेल्या जनसंवाद मेळाव्यात अमित (दादा)कदम यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांनी एकमुखी मागणी केली आहे. त्यामुळे आता माघार नाही, माझ्या माघारीचे दोर जनतेने केव्हाच कापलेत. त्यामुळे तुमच्या भरवशावर आगामी सातारा- जावली विधानसभा निवडणुक लढवणारच, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमितदादा कदम यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मेढा येथे आयोजित जन संवाद मेळाव्यात ते बोलत होते.

 

जनसंवाद मेळाव्यात बोलताना अमित(दादा)कदम म्हणाले, जनसामांन्याची समस्या सोडविण्यासाठी आज आपण एकत्र आलो आहोत.तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मनावर दडपण आहे. आज सातारा-जावलीतील बहुसंख्य कार्यकर्ते विश्वासाने माझ्याकडे येत असतात.त्यांना परिवर्तन हवे आहे. सातारा-जावलीतील निवडणूक आता जनतेने हाती घेण्याची वेळ आली आहे.तुम्ही सर्वांनी दिलेल्या पाठिंब्यावर मी नक्कीच विजयी होईन.सर्वसामान्य माणसाच्या मनात आले तर ते काहीही करू शकतात. जनतेने हातात घेतलेली ही चळवळ आहे. अमित(दादा)कदम उभा राहील; परंतु तुमची साथ असणे गरजेचे आहे. माझ्याकडे कारखाना नाही किंवा सहकारी संस्था नाहीत. पण सामान्य जनतेसाठी मी आहे.

विद्यमान नेतृत्वाला बोंडारवाडीचा प्रश्न सोडविता येत नाही. महु-हातगेघर धरणाचा प्रश्न प्रलंबीत आहे. इथला तरुण उपजिविकेसाठी पुण्या-मुंबईत जात आहे.

ADVERTISEMENT

सभापती असतानाही या मतदारसंघात कोट्यवधींची कामे केली आहेत.माझ्या मतदारांवर माझे प्रेम आहे. तसेच मतदारांचेही माझ्यावर तेवढेच प्रेम आहे. मक्तेदारांसाठी विकास नको. त्याच त्याच रस्त्यावर पैसे खर्च करून खड्डे पडताहेत, आदी प्रश्न उपस्थित करत सत्ताधाऱ्यांवर त्यांनी तोफ डागली.

 

यावेळी उपस्थित लोकांनी अमित(दादा) कदम यांच्याशी संवाद साधताना जावलीतील दहशत संपवा, जावलीत रोजगार उपलब्ध व्हावा, शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कोणाचे लक्ष नाही त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, अमित(दादा)कदमांनी उमेवारी जाहीर करावी, दादांच्या पाठीमागे १००% टक्के उभे राहणार, पुनर्वसनाबाबत महसूल विभाग व नेते उदासिन आहेत आदी प्रश्न उपस्थित करत अमित(दादा)कदम यांच्याकडून अपेक्षाही व्यक्त केल्या. यावेळी साधू चिकणे, नितीन शिंदे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साधू चिकणे यांनी केले, तर आभार योगेश गोळे यांनी मानले.

 

 

चौकाट:

 

सातारा जावलीच्या विकासासाठी काही दिवसांपासून जावलीचे सुपुत्र एकापाठोपाठ एक विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी करू लागले आहेत. परंतु यातील स्थानिक नेत्यांनी लोकसभेला जावलीच्या भूमिपुत्राला मदत केली की नाही याचे विचार मंथन स्वतः आमदार होऊ पाहणाऱ्या नेत्यांनी करावे अशी चर्चा जावलीतील जनमानसातून बाहेर येऊ लागली आहे.त्यामुळे जावलीतील जनता नक्की कोणाच्या पारड्यात विधानसभा टाकणार हे येता काळच ठरवणार आहे. तसेच आमदार शशिकांत शिंदे,माजी आमदार सदाभाऊ सपकाळ, जिल्हा परिषद सदस्य दीपक बापू पवार यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जावलीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!